Elevated Taxiway At Delhi Airport:  Dainik Gomantak
देश

Delhi Airport: वर विमानांचे पार्किंग, त्या खालून धावणार कार....दिल्ली विमानतळावर पाहायला मिळणारे अनोखे दृश्य

आता तुम्हाला दिल्ली विमानतळावर पाहायला मिळणार अनोखे दृश्य

Puja Bonkile

Elevated Taxiway at Delhi Airport: तुम्ही जर दिल्लीला चार- पाच महिन्यानंतर जाणार असाला तर तुम्हाला रस्त्यावरुन अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे. IGI विमानतळाच्या T2 आणि T3 ये-जा करणारऱ्या रोडवर विमाने उभी असलेली दिसणार आहे. येथे एलिव्हेटेड क्रॉस टॅक्सीवे (ECT) चे बांधकाम सुरु होणार आहे.

सध्या सुरक्षेशी संबंधित समस्यांकडे लक्ष दिले जात आहे. यामुळे दिल्लीतील लोकांना विमान टॅक्सीच्या अनोख्या दृश्याचा आनंद घेता येईल. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) च्या विनंतीवर काम सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीवाशीयांना सप्टेंबरपर्यंत हे खास गिफ्ट मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया दिल्लीत बांधल्या जाणाऱ्या या खास टॅक्सीवेबद्दल अधिक माहीती.

वैशिष्ट्य

  • 1.8 किलोमीटर लांब आणि 203 मीटर रुंद टॅक्सीवे ही भारतातील अशा प्रकारची पहिले स्ट्रक्चर आहे.

  • मुख्य T3 रस्ता फक्त त्याच लेवलला राहील. टॅक्सीवे त्याच्या 8 मीटरच्या उंच पुलावर बांधला जाईल.

  • विमानतळाच्या चौथे रनवे आणि T1 च्या विस्तारासह हा टॅक्सीवेही तयार होईल.

  • ECT मध्ये T3 आणि महिपालपूर दरम्यान मुख्य रस्त्यावर 148 मीटरचा पूल असणार आहे.

  • T3 बाजूच्या हद्दीजवळील रस्त्यावर 43.8 मीटरचा पूलही बांधण्यात येणार आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर एक

  • अंडरपास बांधला जात आहे, ज्यावरून एलिवेटेड टॅक्सीवे जाईल.

DIAL ला दोन जंबो जेट आकाराच्या विमानांना सामावून घेण्यासाठी टॅक्सीवेच्या दोन्ही बाजूला एलिव्हेटेड सेन्ट्री पोस्ट उभारण्यास सांगण्यात आले आहे. टॅक्सीवेवर विमानात खराबी आल्यास या सेन्ट्री पोस्टवर उपस्थित असलेले अग्निशमन दल किंवा टॉउ टेंडर मदत करतील.

जगभरात कुठे आहेत असे टॅक्सीवे

जगभरात असे किमान 13 टॅक्सीवे आहेत. यामध्ये सिंगापूरचे चांगी विमानतळ आणि जर्मनीचे फ्रँकफर्ट विमानतळ यांचा समावेश आहे. फ्रान्स, जपान आणि हाँगकाँगमध्ये असे टॅक्सीवे बांधण्यात आले आहेत. दिल्लीत टॅक्सीवे बनवण्यासाठी जगातील किमान 10 टॅक्सीवेचा अभ्यास करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT