Defense Minister Rajnath Singh  Dainik Gomantak
देश

Rajnath Singh: 'PoK मधील अत्याचाराचे परिणाम पाकला भोगावे लागतील'

Jammu and Kashmir: 'जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओके गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल.'

Manish Jadhav

Defense Minister Rajnath Singh: पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर पाकिस्तान अत्याचार करत असून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले. पाकव्याप्त काश्मीर (PoK) पुन्हा ताब्यात घेण्याचे संकेत देताना, संरक्षण मंत्री म्हणाले की, 'जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओके गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल.'

दरम्यान, 'शौर्य दिवस' कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'आम्ही नुकताच जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) आणि लडाखमध्ये (Ladakh) विकासाचा प्रवास सुरु केला आहे, आणि गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये पोहोचल्यावर आमचे लक्ष्य पूर्ण होईल.'

तसेच, 1947 मध्ये या दिवशी भारतीय वायुसेना श्रीनगरमध्ये (Srinagar) दाखल झाल्याच्या स्मरणार्थ 'शौर्य दिना'चे आयोजन करण्यात येते.

'दहशतवादाला धर्म नसतो'

पीओकेमधील लोकांवर पाकिस्तानने (Pakistan) केलेल्या अत्याचाराचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री म्हणाले की, 'शेजारील देशाला “त्याचे परिणाम भोगावे लागतील”. दहशतवादाला धर्म नसतो. भारताला लक्ष्य करणे हेच दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे.'

कलम 370 रद्द करण्यावर ते म्हणाले

राजनाथ सिंह शेवटी म्हणाले की, ''5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांवरील भेदभाव संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील लोकांवरील भेदभाव संपुष्टात आला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT