Defense Minister Rajnath Singh
Defense Minister Rajnath Singh Dainik Gomantak
देश

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सरकारची 'पूर्ण नजर': संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) नव्याने पुन्हा स्थापन होत असलेल्या तालिबान (Taliban) राजवटीमुळे शेजारी देशांबरोबर जगाची चिंतेत अधिक गतीने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील अस्थिरतेचा खेळ अनेक देशांच्या जीवाला घोर लावत आहेत. तर दुसरीकडे भारतासाख्या (India) देशांच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर वेगाने परिणाम जाणवू लागेल आहेत. यातच आता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सोमवारी सांगितले की, अफगाणिस्तानमधील घडामोडींचा फायदा घेऊन कोणत्याही देशविरोधी शक्तीला सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची परवानगी देऊ नये. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या भाषणात सिंह म्हणाले, "अफगाणिस्तानमध्ये जे काही घडत आहे ते सुरक्षेच्या दृष्टीने नवीन प्रश्न निर्माण करत असून आमचे सरकार तेथील घडामोडींवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे."

सिंह पुढे म्हणाले, "भारतीयांच्या सुरक्षेबरोबरच, आमच्या सरकारला देखील हवे आहे की, देशविरोधी शक्ती तेथील घडामोडींचा फायदा घेऊन सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देऊ नये." शिवाय, "आमच्याकडे इतर काही चिंता आहेत ज्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आव्हान बनू शकतात." केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे सतर्क आणि कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि सर्व प्रमुख शहरे ताब्यात घेतली.

सर्व आघाड्यांवर जोरदार काम सुरु

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात काही नवीन धोके देखील उदयास येत आहेत. जे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अधिक धोके गडद दिसू लागले आहेत. जम्मूच्या हवाई दल स्टेशनवरील घटनेने आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्हाला नवीन आव्हानांसाठी राष्ट्रीय सुरक्षा प्रणाली सातत्याने अद्ययावत आणि सुधारित करावी लागेल. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे मोठे काम चालू आहे ते स्वतःच अभूतपूर्व आहे. सुरक्षेशी संबंधित प्रत्येक विभागामध्ये खूप चांगला समन्वय आहे.

सुरक्षिततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, बाह्य सुरक्षा असो किंवा अंतर्गत सुरक्षा असो किंवा मुत्सद्दी आघाडीवर भारताचे धोरणात्मक हितसंबंधांचे संरक्षण आणि बळकटीकरण करण्याचे कार्य असो, आम्ही प्रत्येक आघाडीवर भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षिततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे मोठे काम चालू आहे ते स्वतःच अभूतपूर्व आहे. सुरक्षेशी संबंधित प्रत्येक विभागामध्ये खूप चांगला समन्वय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT