Rajnath Singh  Dainik Gomantak
देश

Rajnath Singh: भाजप सरकारने मीडियावर कधीही बंदी घातली नाही... संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य

वाजपेयी, मोदींच्या सरकारांनी कधीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणली नाहीत

Akshay Nirmale

Rajnath Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात प्रसारमाध्यमांवर बंधने आल्याचा आरोप सातत्याने केला जात असतो. त्यावरून आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपवर वृत्तपत्र स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारे हे विसरतात की भाजप सरकारने कधीही कोणत्याही माध्यम संस्थेवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत किंवा कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणली नाही, असे प्रत्युत्तर संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी रविवारी काँग्रेसच्या आरोपावर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न साप्ताहिक "पांचजन्य"ने आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले की, देशातील सर्वात जुन्या पक्षाचा संपूर्ण इतिहास सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याच्या उल्लंघनाच्या घटनांनी भरलेला आहे. काँग्रेस सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी घटना दुरुस्तीही केली होती.

जे काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगड फेकू नयेत. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याचे स्वातंत्र्य सशक्त आणि चैतन्यशील लोकशाहीसाठी खूप महत्वाचे आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, आज मीडिया स्वातंत्र्यावर आरोप करणारे हे विसरतात की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असो, त्यांनी कधीही कोणत्याही मीडियावर बंदी घातली नाही.

कुठल्याही मीडिया संस्थेवर बंदी घातली नाही किंवा कोणालाही कामावरून कमी केले नाही. तसेच भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केला नाही. काँग्रेसने आणीबाणी लादून प्रसारमाध्यमांची गळचेपी केली होती, हा इतिहास काँग्रेस सोयीस्कररित्या विसरत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप असोसिएशनला माजी मंत्री पाऊसकरांचा जाहीर पाठिंबा; 'त्यांची मागणी रास्त...'

Goa Unemployment: गोव्यातल्या घरफोडीच्या घटनांचा बेरोजगारीशी संबंध? काँग्रेस नेत्याने मांडले तर्क

Migrants Problem in Goa: 'गोमंतकीयांचे' भवितव्य धूसर..! मुख्यमंत्र्यांनी मुद्द्यावर ठेवले बोट; 'काय बिघडलंय गोव्यात' नक्की वाचा

Goa Live Updates: फोटो पत्रकार संतोष मिरजकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम!

SCROLL FOR NEXT