Rajnath Singh Dainik Gomantak
देश

राजनाथ सिंहांची मोठी घोषणा, India करणार तिन्ही सैन्यांची 'संयुक्त थिएटर कमांड' स्थापन

Rajnath Singh: देशाच्या तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी केंद्र सरकार एक संयुक्त थिएटर कमांड स्थापन करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Establishment of Joint Theater Command: देशाच्या तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी केंद्र सरकार एक संयुक्त थिएटर कमांड स्थापन करणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी ही घोषणा केली. जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरमने भारतीय सशस्त्र दलातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिंग म्हणाले की, (कारगिलमधील ऑपरेशन विजयच्या संयुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर) आम्ही एक संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंह म्हणाले की, 'संरक्षण उपकरणांचा जगातील सर्वात मोठा आयातदार म्हणून भारताची ओळख आहे. मात्र आता भारताची वाटचाल निर्यातदार होण्याच्या दिशेने वेगान होत आहे.' देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिल शहीदांचे सर्वोच्च बलिदान देश विसरु शकत नाही. शहीद जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण सन्मान देणे हे समाजाचे आणि जनतेचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

दुसरीकेड, जून 2021 मध्ये, भारतीय हवाई दलाला (Indian Air Force) बोर्डात आणण्यासाठी आठ सदस्यीय पॅनेलची स्थापना केली.

स्थापनेसाठी पाच वर्षे लागू शकतात

भारतीय लष्कराचे थिएटरायझेशन मॉडेल, ज्याची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. आणीबाणीच्या काळात कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही थिएटर कमांड मदत करु शकते, असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. थिएटर कमांड स्थापन करण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागू शकतात. भविष्यातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिन्ही सेना प्रमुखांमध्ये समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांड उपयोगी ठरु शकते. याद्वारे गरज पडल्यास तिन्ही दलांची संसाधने आणि त्यांची शस्त्रे एकाच वेळी वापरता येतील.

देशाने 13000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात सुरु केली

संरक्षण उत्पादनाचा संदर्भ देताना सिंग म्हणाले, "भारत (India) हा जगातील सर्वात मोठा (संरक्षण उत्पादनांचा) आयातदार होता. आज भारत हा जगातील सर्वात मोठा आयातदारच नाही तर संरक्षण निर्यातीत सामील असलेल्या अव्वल 25 देशांपैकी एक आहे.'' सिंग पुढे म्हणाले की, 'देशाने 13,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात सुरु केली आहे. 2025-26 पर्यंत ती 35,000 रुपयांवरुन 40,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT