Defacement of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Bangalore

 

Twitter/ANI

देश

बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

बंगळूरमधील सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

दैनिक गोमन्तक

बंगळूरमधील सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. काही समाजकंटक लोकानी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकून छत्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे.

शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या प्रत्येकासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापकजनक आहे. मागील अनेक महिन्यात कर्नाटक भागातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान करणे, त्यांच्याविषयी अपशब्द बोलणे असे प्रकार घडत होते. या सगळ्या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

आक्रमक शिवप्रेमींनी यानंतर धर्मवीर संभाजी महाराज चौकात रस्ते बंद केले. अनेक ठिकाणी निषेध व्यक्त करत दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे शहरात पोलिस (Police) बंदोबस्त करण्यात आला. याला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींचा पाठिंबा मिळाला. यानंतर याचे पडसाद कोल्हापूरातही उमटले. कोल्हापुरातील शिवसेना युवा सेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी शहरातील कर्नाटक व्यावसायिकांची हॉटेल बंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT