गोमंतकीय लेखक ‘गुगल’ फ्लटरवर

प्रज्योत माईणकर ठरले पहिले युवा भारतीय; शासनाचेही सहकार्य
Gomantakiya author on Google Flutter

Gomantakiya author on Google Flutter

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: अ‍ॅडॉसिडचे संस्थापक युवा गोमंतकीय लेखक प्रज्योत माईणकर (Prajyot Mainkar) यांचे पुस्तक गुगलच्या फ्लटर (Google Flutter) वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. प्रज्योत हे गुगल फ्लटर वेबवर पुस्तक नेणारे पहिले भारतीयही ठरले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून झाले आहे हे विशेष. तिशी ओलांडलेले प्रज्योत हे माहिती तंत्रज्ञान अभियंते आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करणारे विपुल लेखन केले आहे. ‘गुगल फ्लटर मोबाईल डेव्हेलाॅपमेंट क्विक स्टार्ट गायड’ हे त्यांचे पुस्तक गुगलच्या फ्लटर या अधिकृत संकेतस्थळावरील यादीत पोचले आहे. भारतातून (India) गुगल फ्लटर वेबवर जाणारे हे पहिले पुस्तक असून तो मान गोव्यातील युवकाला मिळणे हे भूषणास्पद आहे.

<div class="paragraphs"><p>Gomantakiya author on Google Flutter</p></div>
नोकर भरती प्रक्रिया रद्द करा-काँग्रेस

पन्नासहून अधिक स्टार्टअपस विकसित करण्यास आधार देणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे संकेतस्थळ बांधण्यास मदत करणाऱ्या प्रज्योत यांनी आपले पुस्तक गुगलवर पोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. फ्लटर तंत्रज्ञानाचा उपयोग माहिती तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्यासाठी होणार आहे. अॅंडॉसिड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रज्योत यांनी लहान वयात घेतलेली भरारी मोठी असून त्याचा फायदा गोव्याला घेता आला पाहिजे. काजू व्यापारी प्रकाश माईणकर यांचे ते चिरंजीव आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com