David Warner Dainik Gomantak
देश

David Warner: डेव्हिड वॉर्नरची 'कमाल', 'या' बाबतीत विराटला टाकलं मागे; आता शोएब मलिकच्या विक्रमावर डोळा

David Warner Record: डेव्हिड वॉर्नरने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. या फॉरमॅटमध्ये १३५४५ धावा करून तो टॉप-५ मध्ये पोहोचला आहे.

Sameer Amunekar

ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेत सहभागी होत आहे. तो या स्पर्धेत लंडन स्पिरिट संघाकडून खेळत आहे. ११ जुलै रोजी त्याने मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्धच्या सामन्यात ७१ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने टी-२० स्वरूपात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले. या स्वरूपात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो टॉप-५ मध्ये पोहोचला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोललो तर क्रिस गेल १४५६२ धावांसह अव्वल स्थानावर आहे. किरॉन पोलार्डचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये १३८५४ धावा केल्या आहेत. अ‍ॅलेक्स हेल्स (१३८१४ धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि शोएब मलिक (१३५७१ धावा) चौथ्या क्रमांकावर आहे.

आता डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ४१९ सामन्यांमध्ये १३५४५ धावा केल्या आहेत. विराट कोहली आता या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ४१४ सामन्यांमध्ये १३५४३ धावा केल्या आहेत. आगामी सामन्यांमध्ये वॉर्नरला शोएब मलिकला मागे टाकण्याची संधी असेल. शोएब मलिकला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी २७ धावा कराव्या लागतील.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • ख्रिस गेल: १४५६२ धावा

  • किरोन पोलार्ड: १३८५४ धावा

  • अ‍ॅलेक्स हेल्स: १३८१४ धावा

  • शोएब मलिक: १३५७१ धावा

  • डेव्हिड वॉर्नर: १३५४५ धावा

  • विराट कोहली: १३५४३ धावा

डेव्हिड वॉर्नरच्या टी-२० क्रिकेटमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ४१९ सामन्यांच्या ४१८ डावांमध्ये ३६.८० च्या सरासरीने १३५४५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ११३ अर्धशतके आणि ८ शतके आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या नाबाद १३५ आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १३८८ चौकार आणि ४७७ षटकार मारले आहेत. या दरम्यान तो ५० वेळा नाबाद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT