Goa Tree Cutting: झाडं तोडताय? सावधान! गोवा सरकारचे कडक निर्देश जारी; पारदर्शकतेसाठी नियमांत केले बदल

Goa tree cutting guidelines: गोवा वृक्ष संरक्षण अधिनियम, १९८४ अंतर्गत वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने निर्देश जारी केले आहेत.
Tree Cutting
Tree CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा वृक्ष संरक्षण अधिनियम, १९८४ अंतर्गत वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने निर्देश जारी केले आहेत. नवीन निर्देशांनुसार, वृक्ष तोडीसाठी अर्ज करताना संबंधित जमिनीची मालकी निश्चित करणे बंधनकारक असून, जमीन संयुक्त मालकीची असल्यास सर्व सहमालकांची ना-हरकत घेणे आवश्यक ठरणार आहे.

वृक्षतोडीस दिलेली परवानगी दोन दिवसांत वन विभाग संकेतस्थळावर अपलोड करणे तसेच ग्रामपंचायत, उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व वन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे.

Tree Cutting
Oldest Christmas Tree: 1441 मध्ये उभारलेला युरोपातील पहिला 'ख्रिसमस ट्री', एस्टोनियाची राजधानी, टॅलिनमधील खास नाताळ

वृक्षतोडीचे निकष असे...

दोन झाडांपर्यंत परवानगी उपविभागीय वन अधिकारी देऊ शकतील, तर ५० झाडांपर्यंत परवानगी उपवनसंरक्षक देणार असून, त्यापेक्षा अधिक झाडांसाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. महत्त्वाचे म्हणजे, परवानगी दिल्यानंतर किमान १० दिवसांनंतरच झाडतोड करता येणार येईल.

Tree Cutting
Bel Tree: कूर्मपुराणात लक्ष्मीचे निवासस्थान मानला गेलेला, शिवाच्या तांडवाला शांत करणारा 'बेलवृक्ष'

जेणेकरून बाधित नागरिकांना अपिल दाखल करण्याची संधी मिळणार आहे. वृक्षतोडीनंतर आवश्यक वृक्षारोपण न केल्यास सुरक्षा ठेव जप्त करून शासनामार्फत वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com