Danish Azad Ansari  Dainik Gomantak
देश

योगींच्या मंत्रिमंडळात नवा मुस्लिम चेहरा, जाणून घ्या

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला पक्षाचे तिकीट दिले नाही.

दैनिक गोमन्तक

Danish Azad Ansari Minister: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला पक्षाचे तिकीट दिले नाही. परंतु अपना दल सोनेलालचे हैदर अली स्वार जागेवरुन आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या विरोधात लढला होता, परंतु त्यांचा पराभव झाला. आता यूपीतील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नव्या मंत्रिमंडळात दानिश आझाद अन्सारी नवा मुस्लिम चेहरा म्हणून प्रवेश करणार आहेत. यापूर्वीच्या यूपी सरकारमध्ये (UP Minister) अल्पसंख्याक नेते मोहसिन रझा यांना मंत्री करण्यात आले होते. दानिश आझाद अन्सारी हे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आहेत. (Danish Azad Ansari will enter Yogi Adityanath's cabinet as the new Muslim face)

दरम्यान, योगी 2.0 मध्ये कोणाला मोठी जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बलियाचे युवा नेते दानिश आझाद अन्सारी यांना अल्पसंख्याक आघाडीचे मंत्री करण्यात आले आहे. ते सध्या भाजप (BJP) अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी त्यांचा विद्यार्थीदशेपासून संबंध आहे. मोहसीन रझा यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आले आहे. मोहसिन रझा (Mohsin Raza) हे योगी आदित्यनाथ यांच्या मागील सरकारमध्ये अल्पसंख्याक कल्याण मुस्लिम वक्फ आणि हज मंत्री होते.

दानिश यांचा पूर्वांचलशी संबंध

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारमध्ये भाषा समितीचे सदस्य आणि बलिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले दानिश आझाद यांना योगी सरकार 2 मध्ये मंत्री बनवून पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दानिश आझाद प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. लखनऊ विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करणारे दानिश आझाद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विविध पदे भूषवली. भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना भाषा समितीचे सदस्य करण्यात आले. आझाद हे अल्पसंख्याक समाज आणि तरुणांमध्ये सक्रिय असतात. त्यामुळे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय पाहता त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. दानिश आझाद प्रत्येक प्रसंगी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे कृतज्ञता व्यक्त करत असतात.

भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस

ते म्हणाले होते की, ''उत्तर प्रदेशातील योगीजींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अल्पसंख्याक आणि तरुणांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शिक्षणाच्या पातळीवर विकास आणि अल्पसंख्याकांसाठी कल्याणकारी योजना राबविणे हे सरकारचे प्राधान्य असणार आहे. दानिश आझाद यांचा योगी कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला. सकाळी मला फोन आला. मला तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले.'' गेल्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारमधील भाषा समितीचे सदस्य आणि बलिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले दानिश आझाद यांना पक्षाने भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीसपद देऊन मोठी जबाबदारी दिली होती. ते प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. अल्पसंख्याक समाज आणि तरुणांमध्ये त्यांनी सातत्याने आपली सक्रियता दाखवली आहे. त्यादृष्टीने पक्षाने त्यांचा प्रचार केला आहे.

कोण आहे दानिश आझाद अन्सारी?

दानिश अन्सारी हे योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे मानले जातात. ते दीर्घकाळ अभाविपचे कार्यकर्ते राहीले आहेत. याशिवाय ते यूपी सरकारच्या फखरुद्दीन अली अहमद मेमोरियल कमिटीचे सदस्यही आहेत. अन्सारी यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया आणि लखनऊमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. दानिश आझाद अन्सारी हे बलियातील बसंतपूरचे रहिवासी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT