Young man hanging from a moving vehicle while attempting a dangerous stunt Dainik Gomantak
देश

Stunt Viral Video: 'बच गया बेटा, नाहीतर चांगलीच जिरली असती!' धावत्या वाहनातून लटकणाऱ्या पठ्ठ्याला स्टंटबाजी पडली महागात; काळजाचा ठोका चुकवणारा थरार व्हायरल

Dangerous Social Media Stunt Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या रिक्षात प्रवास करताना दिसत आहे. प्रवास शांतपणे करण्याऐवजी तो केवळ एक स्टंट व्हिडिओ बनवण्यासाठी धावत्या रिक्षाच्या बाहेर डोके आणि अर्धे शरीर काढून लटकतो.

Manish Jadhav

Dangerous Social Media Stunt Viral Video: सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चार युजर्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जायला तयार असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळते. रिल्स, व्ह्यूज आणि लाईक्सच्या शर्यतीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकजण जीवघेणे स्टंट करताना दिसतात. असाच एक चक्रावून टाकणारा आणि डोळे उघडणारा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केलेल्या एका मूर्खपणामुळे तरुण थोडक्यात जीवनिशी वाचला.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे. प्रवास शांतपणे करण्याऐवजी तो केवळ एक स्टंट व्हिडिओ बनवण्यासाठी धावत्या रिक्षाच्या बाहेर डोके आणि अर्धे शरीर काढून लटकतो. धावत्या वाहनातून बाहेर डोकावणे किती धोक्याचे असते हे माहित असूनही तो कॅमेऱ्यासमोर स्टंटबाजी करतो. पण पुढच्याच क्षणी नियतीने त्याला असा काही धडा शिकवला जो तो आयुष्यात कधीच विसरणार नाही. रिक्षा पुढे जात असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या फांदीचा जोरात फटका त्याला बसतो.

दैव बलवत्तर म्हणून ती झाडाची मऊ फांदी होती; जर त्या जागी एखादा सिमेंटचा खांब, विजेचा पोल किंवा समोरुन येणारे भलंमोठं वाहन असतं, तर या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असता. अवघ्या एका सेकंदाच्या निष्काळजीपणामुळे त्याचा जीव जाऊ शकला असता.

हा थरारक व्हिडिओ 'एक्स' वर @Sanjay_tyagi143 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. "एक छोटीशी चूक अन् माणूस थेट देवाघरी! केवळ काही व्ह्यूज अन् लाईक्ससाठी आजची मुले स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत, असे धोकादायक स्टंट करणे अजिबात समजूतदारपणाचे नाही," असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले. नेटिझन्सनी देखील या व्हिडिओवर संताप व्यक्त केला. 'बच गया बेटा, नाहीतर सगळी मस्ती जिरली असती', 'केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलास' अशा खरमरीत प्रतिक्रिया देत युजर्सनी सोशल मीडियावर (Social Media) लाईक्स मिळवण्याच्या या वेडेपणावर आणि स्टंटबाजीवर जोरदार ताशेरे ओढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT