Ditwah Cyclone Dainik Gomantak
देश

Ditwah Cyclone: 'दित्वा' चक्रीवादळाचे थैमान! श्रीलंकेत अडकले 300 भारतीय, तामिळनाडू-आंध्रमध्ये रेड अलर्ट, 54 विमानांची उड्डाणे रद्द

Ditwah Cyclone Latest Update: श्रीलंकेमध्ये मोठा विध्वंस घडवल्यानंतर ‘दित्वा’ चक्रीवादळ आता भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे.

Manish Jadhav

Ditwah Cyclone Latest Update: श्रीलंकेमध्ये मोठा विध्वंस घडवल्यानंतर ‘दित्वा’ चक्रीवादळ आता भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. याच्या प्रभावामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीच्या किनारी भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ शनिवार (29 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबर रोजी हे चक्रीवादळ तामिळनाडू-पुदुच्चेरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे, ज्यामुळे राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.

शिक्षण, वाहतूक विस्कळीत आणि NDRF तैनात

चक्रीवादळाच्या धोक्यामुळे तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरीमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील 54 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पुद्दुचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीने चक्रीवादळामुळे शनिवारी (29 नोव्हेंबर) सुट्टी जाहीर करुन सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याशिवाय, पुदुच्चेरी, कराईकल, माहे आणि यनम येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारपर्यंत (1 डिसेंबर) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

दित्वा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूतील किनारपट्टीच्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. विलुप्पुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, नागपट्टिनम, तिरुवरुर, तंजावर, पुदुकोट्टई आणि मायिलादुथुराई या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील पुणे आणि गुजरातमधील वडोदरा येथील एनडीआरएफच्या तळावरुन अतिरिक्त 10 तुकड्या चेन्नईसाठी रवाना झाल्या आहेत, ज्यामुळे एकूण बचाव पथकांची संख्या वाढली आहे.

श्रीलंकेत हाहाकार, 300 भारतीय प्रवासी अडकले

श्रीलंकेमध्ये ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनामुळे 123 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 130 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची नोंद आहे. चेन्नईची विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे सुमारे 300 भारतीय प्रवासी कोलंबो विमानतळावर गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. हे सर्व प्रवासी दुबईहून श्रीलंकेमार्गे भारतात परतत होते. विमानसेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत त्यांना तिथेच थांबावे लागणार आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आयएमडीचा धोक्याचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, दित्वा चक्रीवादळ 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू-पुदुच्चेरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. यामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस पडेल. तामिळनाडू, आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि पुदुच्चेरी या भागांमध्ये मोठा पूर येऊ शकतो. तसेच, डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असून, या भागात अचानक पूर येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shantadurga Devi Jatra: श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची जत्रा, सर्व धर्म एकतेचे प्रतिक

नाताळच्या गर्दीत जीवरक्षक ठरले 'देवदूत'! 6 पर्यटकांना जीवदान, तर हरवलेली 6 मुले पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन

पृथ्वीच्या अंगावर जसे ऋतू खेळतात त्याच प्रकारे आपल्या शरीरात पचन इंद्रिये ऋतूंचे खेळ खेळतात; विचारांचे ऋतुचक्र

'2026'चं स्वागत करा ग्लॅमरस! बागा बीचवर तमन्ना भाटिया लावणार हजेरी; असे आहेत तिकीट दर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या गोवा, कर्नाटक, झारखंडच्या दौऱ्यावर; कारवार बंदरातून करणार पाणबुडी सफर

SCROLL FOR NEXT