trains  Dainik Gomantak
देश

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका, 'या' 67 रेल्वे गाड्या रद्द

बिपरजॉय चक्रवादळाची तीव्र रुप लक्षात घेता रेल्वे विभागाने 67 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

Puja Bonkile

Cyclone Biparjoy Latest News: बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रामध्ये लाटांनी रुद्र रुप धारण केले आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वर सरकले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी हे चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता दर्शवली आहे.

यामुळे परिस्थिती लक्षात घेता रेल्वे विभागाकडून 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची देखील स्थापना केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ अनिल कुमार लाहोटी आणि इतर बोर्ड सदस्य परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, 13 जून ते 15 जून या दरम्यान 95 गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर 67 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या तीव्र रुप लक्षात घेता स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल पुरेशा साठ्यासह उघडे राहतील जेणेकरून अडकलेल्या प्रवाशांना त्रास होणार नाही. प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेस आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतात लवकरच धडकणार 'बिपरजॉय'

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता वर ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर केंद्रीत झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता आहे. आयएमडीने कच्छपासून मुंबईपर्यंत अलर्ट जाहीर केला आहे. आयएमडीने असे ट्विट करत ही माहिती दिली आहे.

  • मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई

गुजरातच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी भागात मासेमारीवर (Fishing) बंदी घालण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील लोकांना समुद्रातून बाहेर काढले जात आहे. पीटीआयने पंतप्रधान कार्यालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालय चक्रीवादळ बिपरजॉयच्या परिस्थितीचा सतत आढावा घेत आहे. एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात आहेत, तर आणखी 15 टीम तयार आहेत.

  • पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

चक्रीवादळाचे तीव्र रुप लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पृथ्वी विज्ञान सचिव एम रविचंद्रन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कमल किशोर आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबीला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत ताशी 125 ते 135 किलोमीटर वेगाने वादळ वाहू शकते आणि वाऱ्याचा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT