Cyber Fraud Dainik Gomantak
देश

Cyber Fraud: अतिविश्वास नडला! ज्याच्याकडे बॅंक अकाउंट सांभाळायला दिले, त्यानेच 14 कोटी गुल केले

Odisha Cyber Crime: यासाठी IServeU ने कंपनीला व्यावसायिक वापरासाठी त्याचे UPI API देखील दिले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

Ashutosh Masgaunde

iServe Lost 14cr in Cyber Fraud in Odisha: ओडिशातील फिनटेक कंपनीच्या QR कोडमध्ये फेरफार करून 14 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका धक्कादायक प्रकरण समोर आणले आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थिक फसवणूक झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ६ जुलै रोजी करण कुमार सिंग नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. तो उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर-19 येथील रहिवासी असून त्याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर भुवनेश्वर येथे आणण्यात आले होते.

कंपनीच्या अधिकाऱ्याने दाखल केली तक्रार

आर्थिक गुन्हे शाखेचे महानिरीक्षक जेएन पंकज यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, भुवनेश्वरस्थित फिनटेक कंपनी 'iServe टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड' चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजीब कुमार परिदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे EOW ने 29 जून रोजी गुन्हा नोंदवला.

एप्रिलमध्ये करार

तक्रारदाराने आरोप केला की, त्याने एप्रिल-मे 2023 दरम्यान नोएडा-आधारित कंपनी Payone Digital Services Pvt Ltd च्या संचालकांसोबत तंत्रज्ञान एकत्रीकरण करार केला होता.

"डिजिटल पेमेंट सेवा प्रदान करणे आणि फिनोटेक सेवा सुलभ करणे यासाठी हा करार होता. यासाठी IServeU ने कंपनीला व्यावसायिक वापरासाठी त्याचे UPI API देखील प्रदान केले होते," असे तक्रारीत म्हटले आहे.

14.33 कोटींचा घोटाळा

अटक आरोपी करण कुमार सिंग आणि त्याचा भाऊ लल्लू सिंग हे पायोन डिजिटल सर्व्हिसेस प्रा.लि.चे संचालक आहेत.

तक्रारीत म्हटले आहे, "UPI लॉगच्या पडताळणीवर, असे आढळून आले की करण सिंग आणि लल्लू सिंग यांनी तक्रारदार कंपनीने दिलेल्या QR कोडमध्ये फेरफार केला आणि 14.33 कोटी रुपयांचे अतिरिक्त क्रेडिट चोरले."

तपास पथक तज्ज्ञांची मदत घेणार आहे

या गुंतागुंतीच्या आणि अत्यंत तांत्रिक प्रकरणात इतर अनेक आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय आहे.

यापूर्वी असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नसल्यामुळे, EOW या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ञांची मदत घेईल," असेही अधिकाऱ्याने सांगितले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चीनी लिंकचा संशय

एका निवेदनात, अधिकाऱ्याने म्हटले आहे की पेआउट वॉलेटमधून 125 हून अधिक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले गेले होते.

ज्यामध्ये यूजर आयडी आणि पासवर्ड Payone Digital Services Pvt Ltd सह सार्वजनिक केले गेले होते. तक्रारदार कंपनी IServeU Ltd. EWO अधिकाऱ्यांनाही या घोटाळ्यात चिनी लिंक असल्याचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT