Tata Power Cyber Attack
Tata Power Cyber Attack  Dainik Gomantak
देश

Tata Power Cyber Attack: देशातील सर्वात मोठ्या खासगी वीज कंपनीवर सायबर हल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Tata Power Cyber Attack: देशाच्या उर्जा क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी असलेल्या टाटा पॉवरवर सायबर हल्ला झाला आहे. कंपनीच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर हा हल्ला झाला आहे, स्वतः कंपनीनेच ही माहिती दिली आहे. तसेच या सायबर हल्ल्याने फारसे नुकसान झालेले नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

यापुढेही सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत, सर्व महत्वाच्या सिस्टिम्स योग्यरितीने कार्यरत आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे. टाटा पॉवर ही देशातील एक महत्वाची वीज पुरवठादार कंपनी आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टाटा पॉवरतर्फे वीज पुरवठा केला जातो. टाटा पॉवरचे मुख्यालय मुंबईत असून 10,577 मेगावॅट वीज निर्मितीची कंपनीची क्षमता आहे. ही देशातील सर्वात मोठी खासगी वीज कंपनी मानली जाते.

कंपनीच्या पायाभूत यंत्रणेवरच हा हल्ला झाला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या एकूण सिस्टिमवर पडला आहे. टाटा पॉवर कंपनीने शेअर बाजारालाही देखील याबाबत कल्पना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी आणि ग्राहकांशी संबंधित असलेल्या टच पॉईंट आणि पोर्टलबाबत अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

कंपनीने म्हटले आहे की, आमच्या सर्व सिस्टिम्स ठीक आहेत, या हल्ल्याचा फारसा काही परिणाम झालेला नाही. काही आयटी सिस्टिम्सवर परिणाम झाला आहे. या प्रकरणी कंपनी सतत अपडेट देत राहील.

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलच्या माहितीनुसार टाटा पॉवरसह इतर वीज कंपन्यांवर अशा हल्ल्याची पूर्वमाहिती मिळाली होती. संबंधित कंपन्यांना अलर्टही केले गेले होते. फायरवॉलचे ऑडिट केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT