crime news

 

Dainik gomantak

देश

दिल्लीत IAS ऑफिसरच्या मुलाची आत्महत्या, सहाव्या मजल्यावरून मारली उडी

अनेक छोट्या-मोठ्या कारणांमुळे तरुणांनी असे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहेत

दैनिक गोमन्तक

दिल्लीत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जेव्हा मुलाने हे भयानक पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील मार्केटमध्ये होते आणि मुलगा घरी एकटाच होता. अपघातानंतर शेजाऱ्यांनी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथे उपचारानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.

क्राईम (Crime) टीम आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. गेल्या सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. विशेष म्हणजे आजकाल अनेक छोट्या-मोठ्या कारणांमुळे तरुणांनी असे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतेच अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने कथित आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

हे प्रकरण चेन्नईच्या बाहेरील भागातील आहे. या मुलीची सुसाईड (Suicide) नोट खूपच भावूक होती. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते- 'शिक्षकांवर विश्वास ठेवू नका ना नातेवाईकांवर... आता मुलींसाठी फक्त आईच सुरक्षित आहे'. या नोटची सुरुवात 'Stop Sexual Harrasment' या शब्दांनी होते. मुलीने पत्रात लिहिलं होतकी, मी आता हे सहन करू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT