Crime News Dainik Gomantak
देश

उपचारांसाठी आलेल्या मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढायचा...; एका चुकीमुळे असा सापडला विकृत डॉक्टर

Crime News: नोएडामधील एका डॉक्टरच्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपमधून मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत.

Manish Jadhav

Noida Doctor Case: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडामधील एका डॉक्टरच्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपमधून मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत.

महिला रुग्ण त्याच्याकडे उपचारासाठी आली असताना डॉक्टरने हे फोटो काढल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल.

दरम्यान, हे प्रकरण नोएडाच्या सेक्टर-20 पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-30 मध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचे क्लिनिक आहे.

मानसिक समस्यांनी ग्रस्त लोक त्यांच्याकडे समुपदेशनासाठी येतात. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

डॉक्टरचा पर्दाफाश

दुसरीकडे, उपचारादरम्यान मुलांचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप डॉक्टरवर (Doctor) आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलीवर उपचारादरम्यान मानसोपचार तज्ज्ञाने असाच प्रकार केला होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांना संशय आला.

त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत तोंडी तक्रार केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा डॉक्टरांच्या क्लिनिकमधील लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरुन अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो सापडले.

तपासात ही बाब समोर आली आहे

मात्र, मंगळवारी रात्री केलेल्या तपासणीत डॉक्टरने कुठेही अश्लील कंटेट अपलोड किंवा व्हायरल केलेला नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी बुधवारी डॉक्टरला अटक केली. त्याची चौकशी सुरु आहे.

दुसरीकडे, या प्रकरणी नोएडाचे डीसीपी हरिश्चंद्र यांनी सांगितले की, आरोपी मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध आयपीसीच्या अनेक संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली सेक्टर 20 चे पोलीस पथक अटक केलेल्या डॉक्टरचा डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करत आहे. याशिवाय, पोलीस डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT