Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

cow enters football match: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने क्रीडाप्रेमींसह सर्वसामान्यांचेही भरपूर मनोरंजन केले आहे.

Sameer Amunekar

फुटबॉल सामन्यादरम्यान अनेकदा अनपेक्षित घटना घडताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने क्रीडाप्रेमींसह सर्वसामान्यांचेही भरपूर मनोरंजन केले आहे. एका मैदानात सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यात अचानक एका गाईने प्रवेश केला आणि काही क्षणांतच ती संपूर्ण खेळाची केंद्रबिंदू बनली.

मैदानात घडला अनोखा प्रकार

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण फुटबॉल खेळताना दिसतात. खेळ रंगात आला असतानाच एक गाय मैदानात येते आणि थेट फुटबॉलजवळ जाऊन उभी राहते. सुरुवातीला खेळाडूंना हा प्रकार विनोदी वाटतो, मात्र काही वेळातच गाय बॉलपासून कोणालाही जवळ येऊ देत नसल्याचे दिसून येते.

खेळाडूंनी बॉल परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कोणी पुढून तर कोणी बाजूने बॉल काढण्याचा प्रयत्न केला, पण गायने प्रत्येक वेळी त्यांना चकवले. विशेष म्हणजे तिच्या हालचाली पाहून ती जणू एखाद्या प्रशिक्षित फुटबॉलपटूप्रमाणे बॉलचे संरक्षण करत असल्याचा भास होत होता.

बॉलच्या मागे गाईची धाव

बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर एका तरुणाला बॉल बाहेर काढण्यात यश आले. त्याने बॉल पुढे लाथाडताच गायही त्याच्या मागे वेगाने धावत सुटली. काही क्षण मैदानावर खेळाडू आणि गाय यांच्यात एक वेगळीच स्पर्धा रंगली. उपस्थित लोक हा प्रकार पाहून मोठ्याने हसत होते.

गाय पुन्हा एकदा बॉलजवळ पोहोचली आणि खेळाडूंना पुन्हा तिच्याशी झुंज द्यावी लागली. त्यामुळे काही काळासाठी फुटबॉल सामना बाजूलाच राहिला आणि सर्वांचे लक्ष या अनोख्या पाहुण्याकडे वळले.

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा

मैदानावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हजारो लोकांनी तो पाहिला असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींनी गाय पूर्वजन्मी फुटबॉलपटू असावी, अशी गंमतीशीर टिप्पणी केली. तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या बॉलवरील नियंत्रणाची तुलना जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीशी केली. त्यामुळे “ही तर मेसीची फीमेल व्हर्जन आहे” अशी प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे.

मनोरंजनाचा ठरला विषय

सामान्यतः प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होतात. मात्र फुटबॉल मैदानात उतरून खेळाडूंनाच चकवणाऱ्या या गायने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही मिनिटांचा हा व्हिडिओ लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणत असून सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT