Covid-19 JN.1 Variant Dainik Gomantak
देश

Covid-19 JN.1 Variant: कोरोना पुन्हा कहर करणार? JN.1 प्रकार किती धोकादायक? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Covid-19: एका आठवड्यापूर्वी काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. आता भारतातही या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत प्रकरणे वाढत आहेत.

Sameer Amunekar

२०२० मध्ये जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक देशांनी या संकटावर नियंत्रण मिळवलं असलं, तरीही विषाणूचा पूर्णतः समूळ नाश झालेला नाही. सध्या पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेषतः सिंगापूरपासून भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या कोविडचा जे एन.१ (JN.1) प्रकार थैमान घातल आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार जे एन.१ खरोखर एक नवीन आणि धोकादायक प्रकार आहे का? याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचे उत्तर शोधण्यासाठी आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे.

एम्स दिल्ली येथील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांच्या मते, जेएन.१ प्रकार हा ओमिक्रॉन या आधीच्या प्रकाराचा एक उपप्रकार आहे. हा सुमारे दीड वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे हा कोणताही नवीन प्रकार नाही. मात्र, याच्या संक्रमणाचा वेग जास्त असू शकतो.

या उपप्रकारामुळे रुग्णांना सौम्य लक्षणे जाणवतात, जसे की खोकला, सर्दी, सौम्य ताप, डोकेदुखी. श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम किंवा ऑक्सिजनची गरज बहुतेक रुग्णांना भासत नाही,” असे डॉ. राय यांनी स्पष्ट केलं.

तज्ज्ञांच्या मते, घाबरण्याची गरज नाही. कोविडचा हा प्रकार जीवघेणा नाही आणि त्याचे बहुतेक लक्षणे सौम्य स्वरूपाचीच आहेत. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना आधीपासून इतर गंभीर आजार आहेत, वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

विषाणू कधीच पूर्णपणे नष्ट होत नाहीत. ते विविध प्रकारांमध्ये आपल्या भोवती राहतात. म्हणूनच काळजी घेणे, मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या सवयी या गोष्टी आवश्यक आहेत,” असे डॉ. राय यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूचा JN.1 हा उपप्रकार सध्या पुन्हा चर्चेत आला असला, तरी तो पूर्णतः नवीन नाही आणि घाबरण्याइतका घातकही नाही. मात्र, आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने स्वतःची काळजी घेणे आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Auction: दमदार कामगिरीचं फळ! सुयश, ललित अन् अभिनव आयपीएल लिलावात; गोव्याच्या त्रिकूटावर सर्वांच्या नजरा

Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

Zilla Panchayat Election: धारगळ मतदारसंघात काँग्रेसमध्‍ये उफाळला कलह, ऐनवेळी ज्ञानेश्‍‍वर शिवजी यांना उमेदवारी नाकारल्‍याने बंडाचा सूर

Goa Live Updates: 11 लाखांच्या अंमली पदार्थासह 44 वर्षीय व्यक्तीला अटक

Goa Banana Production: राज्यात नारळ, काजूपाठोपाठ केळीचे बंपर उत्पादन! तरीही महाराष्ट्र-कर्नाटकातून का करावी लागतेय आयात?

SCROLL FOR NEXT