Booster Dose Dainik Gomantak
देश

Booster Dose:आजपासून 75 दिवस सर्व प्रौढांना मोफत बूस्टर डोस, कुठे अन् कसे जाणुन घ्या एका क्लिकवर

COVID-19 Booster Dose News: आत्तापर्यंत देशात लसीचे 199 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतात आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून, कोरोना (corona) चा बूस्टर डोस विनामूल्य सुरू झाला आहे. यापूर्वी तिसऱ्या डोससाठी पैसे खर्च करावे लागत होते, मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोदी सरकारने पुढील 75 दिवस मोफत देण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर खुद्द पीएम मोदींनी ट्विट (Twitter) करून लस ही कोरोनाविरुद्धची लढाई असल्याचे म्हटले होते. हा निर्णय भारताच्या लसीकरण मोहिमेला पुढे नेण्यासाठी काम करेल. (COVID-19 Booster Dose news)

* लसीकरणाला गती मिळणार
सरकारच्या या निर्णयानंतर देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबत लोकांमध्ये जसा उत्साह होता, तसाच बूस्टर डोसबाबतही (Booster Dose) दिसत नसल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे.

याचे एक मोठे कारण हे देखील होते की ते सर्वसामान्यांना मोफत दिले जात नव्हते. यासाठी त्यांना पैसे मोजावे लागले. त्याचवेळी, कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यामुळे लोकांमध्ये असा निष्काळजीपणा दिसून आला. तसेच अनेक आरोग्य तज्ञ वारंवार इशारा देत आहेत की लोकांनी त्यांच्या आरोग्याशी (Health) खेळू नये आणि शक्य तितक्या लवकर बूस्टर डोस घ्यावा, कारण देशातून कोरोनाचा (Corona) नायनाट झालेला नाही.

आत्तापर्यंत इतक्या लसी दिल्या गेल्या
देशात लसीचे 199 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ज्यामध्ये तिसऱ्या किंवा सावधगिरीच्या डोसची संख्या सुमारे 5 कोटी आहे. आता येत्या काही दिवसांत हा आकडा झपाट्याने वाढेल, असा अंदाज आहे. 18-59 वयोगटातील लोकांसाठी सावधगिरीचा डोस यावर्षी 10 एप्रिलपासून सुरू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT