Covaxin  Dainik Gomantak
देश

Covaxin 77.8 टक्के प्रभावी; भारत बायोटेकने केला दावा

देशात कोरोनाच्या (Covid 19) डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) प्रकाराचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणाच वाढू लागला असताना दुसरीकडे कोव्हॅक्सिन लस (Covaxin) 77.8 टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने (Bharat Biotech) केला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाच्या (Covid 19) डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) प्रकाराचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणाच वाढू लागला असताना दुसरीकडे कोव्हॅक्सिन लस (Covaxin) 77.8 टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने (Bharat Biotech) केला आहे. तिसऱ्या वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन लस घेतली असता तीव्र गतीने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा केला आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात 93.4 टक्के प्रभावी असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.

भारत बायोटेकने एनआयव्ही (NIV) आणि आयसीएमआर (ICMR) पुणेसोबत भागीदारी करत कोरोनाविरोधातील कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती करण्यात आली आहे. भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणं असणाऱ्या 130 जणांची चाचणीही करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यात देशभरातील एकूण 25 ठिकाणी ही चाचणी पार पडली आहे. चाचणीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेतला होता.

कंपनीने सीचा परवाना मिळालेल्या कोणत्याही संसर्गाविरोधात एवढी कार्यक्षमता दाखवलेली नसून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळेल असही कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इल्ला (Suchitra Illa) यांनी भारताची क्षमता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वचनबध्दतेसह जागतिक नकाशावर ठेवल्याचा आम्हाला अभिमान आहे.

भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणं असणाऱ्या 25 शहरांमधील 18 वर्षवयोगटातील एकूण 130 नागरिकांवर वैद्यकीय चाचणी केली. यावेळी त्यातील 12 टक्के लोकांना काही प्रमाणात त्रास जाणवला. तर 0.5 टक्क्यांपेक्षा कमी लोकांना गंभीर गंभीर त्रास जाणवला, अशी माहिती भारत बायोटेक कंपनीने दिली आहे. यावेळी त्यांनी इतरही कोरोना लसींच्या तुलनेत प्रतिकूल परिणामचा दरही कमी असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT