किरकोळ व घाऊक व्यापारांना एमएसएमई(MSME) म्हणून समाविष्ट केल्याने केंद्र सरकारने(Central Government) एमएसएमईसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी शनिवारी यास एक “महत्त्वाचा टप्पा” असल्याचे म्हटले आणि ते म्हणाले की, या निर्णयामुळे व्यपाऱ्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल आणि त्यांना विविध फायदेही मिळतील. असे आश्वासनही नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी दिली आहे .
"आमच्या सरकारने किरकोळ व घाऊक व्यापारास एमएसएमई म्हणून समाविष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे कोट्यावधी व्यापाऱ्यांना सुलभ वित्त, इतर विविध लाभ मिळण्यास मदत होईल आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. आम्ही आमच्या व्यापार्यांना सक्षम बनविण्यासाठी वचनबद्ध आहोत," असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे .
किरकोळ व घाऊक व्यापारांना एमएसएमई म्हणून समाविष्ट केल्याने केंद्रीय एमएसएमई व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.त्याच योजनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपले मत मांडले आहे.
सुधारित मार्गदर्शक सूचनांमुळे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापा-यांना फायदा होणार असून किरकोळ व घाऊक व्यापार एमएसएमईच्या कक्षेत सोडले गेले आहेत, आता सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ व घाऊक व्यापाराला आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्य क्षेत्रातील कर्जाचा लाभ मिळेल.असेही नितीन गडकरी यांनीह सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.