भारतात (India) कोरोनची दुसरी लाट (Corona 2nd Wave) आता हळूहळू आटोक्यात येऊ लागली आहे तरीसुद्धा तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका अजूनही आहे. लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक असल्याचा इशारा यापूर्वीच तज्ञांनी दिला आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी अद्याप तरी प्रतिबंधात्मक लस (Vaccine) तयार झालेली नाही, त्यामुळे भारतातील पालकही चिंतेत आहेत. परंतु आता एक आनंदाची नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे येत्या दोन आठवड्यात कोरोनाची लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार आहे, याविषयीची माहिती निती आयोगाने (Niti Ayog, India) दिली आहे. (Corona Vaccine)
यासाठी झायडस कॅडीला (Zydus Cadila) या कंपनीला पुढील दोन आठवड्यासाठी 12 ते 18 वर्षाच्या मुलांसाठीच्या लसीच्या इमर्जन्सी (Emergency Vaccine for Children) वापराची परवानगी मिळू शकते, याविषयीची माहिती निती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल (Dr V K Paul) यांनी दिली आहे. 12 ते 18 वर्ष (Vaccine For 12 to 18)वयोगटातल्या मुलांसाठी झायडस कॅडीलाची लस ही 67% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासाठी झायडस कॅडीला औषध कंपनीने इमर्जन्सी वापराच्या परवानगीसाठी असलेल्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत. अहमदाबाद मध्ये असलेल्या झायडस कॅडीला या कंपनीने लहान मुलांच्या लसीच्या चाचण्यांचे दोन टप्प्यांचे निष्कर्ष भारतीय औषध महानियंत्रककडे (DCGI) सुपूर्द केले आहेत. डीसीजीआयने परवानगी दिल्यास येत्या दोन आठवड्यात झायडस कॅडीलाच्या लसीच्या वितरणाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती अधिकार्याकडून प्राप्त झाली आहे. झायडस कॅडीला कडून तिसऱ्या टप्प्याची चाचणी देखील पूर्ण झाली आहे, असेही सांगण्यात आले आहे यामध्ये 28000 स्वयंसेवकांनी (28000 Volunteers) सहभाग घेतला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.