Omicron Variant

 
Dainik Gomantak
देश

देशात ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 400 पार, केंद्र सरकार सतर्क

'या '10 राज्यांमध्ये केंद्र सरकार पाठवणार टीम

दैनिक गोमन्तक

ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेस पाहता देशातील अनेक राज्यांमध्ये ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीजवर बंदी घालण्यात आली आहे. अस असल तरी ओमिक्रॉनचे रुग्ण देखील वाढत आहेत. ओमिक्रॉनचे देशभरात 400 रुग्णांची नोंद झाली आहे. हे पाहता 25 डिसेंबरपासून सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चर्च आणि उत्सवाच्या ठिकाणांना कोविडशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ओमिक्रॉनचा (Omicron Variant) वाढता धोका लक्षात घेऊन सरकार (Government) लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे सरकारने अशा 10 राज्यांची यादी तयार केली आहे, जिथे कोविड लसीकरणाची प्रक्रिया खूपच कमी आहे. आरोग्य (Health) मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता केंद्राकडून अशा राज्यांमध्ये एक टीम पाठवली जाईल. कारण या राज्यांमध्ये लसीकरणाला गती मिळेल. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये टीम पाठवले जाणार आहे.

देशात ओमिक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार (Central Government) 10 राज्यांमध्ये आपली विशेष टीम पाठवणार आहे. शनिवारी ही माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, "10 राज्यांमध्ये केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापैकी काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर काही राज्यांमध्ये लसीकरणाची गती मंद आहे. आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT