Covid Updates Dainik Gomantak
देश

देशात कोरोना संसर्गाचा आलेख चढाच; मार्चनंतर सर्वाधिक नवे रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत 4041 नवे कोरोना रुग्ण

दैनिक गोमन्तक

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असताना प्रशासन मंकीपॉक्सला अटकाव कसा करावा यामध्ये गुंतले आहे. असे असताना दुसरीकडे देशात वेगाने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरत आहे. कारण देशात गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामूळे कोरोना फैलावणार का ? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. कारण देशात 11 मार्चनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 4 हजार 41 नवे रुग्ण वाढल्याच स्पष्ट झालं आहे. (Corona infection is on the rise in the country; Most new patients since March 11 )

कोरोना मृतांचा आकडा हा गुरुवारी दिवसभरात 10 वर पोहोचला आहे. ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात 3712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढत आहे. सद्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांच्या वेगाने वाढण्यामागे अनेक घटक जबाबदार

महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, या तेजीमागे अनेक घटक आढळून येऊ शकतात. त्यावेळी ते म्हणाले की सामान्य आर्थिक क्रियाकलापांमध्ये लोकांचा अधिक संवाद, कोविड-योग्य वर्तनातील हलगर्जीपणा आणि मास्क न घालणे ही काही कारणे आहेत. ओमिक्रॉन प्रकार BA.4 आणि BA.5 ला देखील यासाठी जबाबदार धरले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत BA.4 आणि BA.5 Omicron प्रकारांची आत्तापर्यंत सात प्रकरणे आढळून आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

SCROLL FOR NEXT