Merck ची अँटीव्हायरल गोळी Molnupiravir ला काही दिवसात मिळणार मंजुरी  Dainik Gomantak
देश

कोरोनावर आता घरीच उपचार करता येणार, अँटीव्हायरल गोळीला लकरच मिळणार मंजूरी

ब्रिटनमध्ये याच्या वापराला परवानगी दिल्यानंतर एसईसी (SEC) त्यावर लक्ष ठेऊन आहे. अशा स्थितीत मला वाटते की त्यांना लवकरच यासाठी परवानगी मिळेल. त्यामुळे मर्कच्या (Merck) औषधाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय येत्या महिनाभरात घेतला जाऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या COVID-19 रूग्णांच्या उपचारासाठी Merck ची अँटीव्हायरल गोळी Molnupiravir (Antiviral pill Molnupiravir) ला काही दिवसात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, CSIR चे अध्यक्ष डॉ. राम विश्वकर्मा यांनी एका माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली आहे. हे औषध अशा लोकांसाठी आहे, ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत. किंवा त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आहे. ते म्हणाले, फायझरची दुसरी गोळी पॅक्सलोविडला (Paxlovidal) आणखी काही वेळ लागू शकतो.

दोन औषधांच्या येण्याने मोठा फरक पडेल आणि आपण महामारी संपवण्याच्या दिशेने आधीक जलद गतीने वाटचाल करु, तेव्हा लसीकरणापेक्षा ते अधिक महत्त्वाचे असल्याचे सिद्ध होईल.

औषधांमुळे या विषाणुला काबुत ठेवण्यासाठी आता शेवटचे काही उपाय सुरु आहेत. ते म्हणाले, मला वाटते की मोलनुपिरावीर लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होईल. औषध निर्मात्यासोबत पाच कंपन्या यावर काम करत आहेत. मला वाटते की त्याच्या वापरासाठी लवकरच मान्यता मिळेल.

ब्रिटनमध्ये याच्या वापराला परवानगी दिल्यानंतर एसईसी त्यावर लक्ष ठेऊन आहे. अशा स्थितीत मला वाटते की त्यांना लवकरच यासाठी परवानगी मिळेल. त्यामुळे मर्कच्या औषधाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय येत्या महिनाभरात घेतला जाऊ शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Pfizer ने एक निवेदन जारी केले आहे. त्या त्यांनी म्हणले आहे, क्लिनिकल चाचण्यांनुसार, त्यांची Paxlovid गोळी असुरक्षित रूग्णांमध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी करते.

मर्कने यापूर्वीच पाच कंपन्यांशी करार केला आहे. ज्याप्रमाणे Merck ने अनेक कंपन्यांना हा परवाना दिला आहे, त्याचप्रमाणे Pfizer देखील औषधाच्या जागतिक वापरासाठी भारतीय क्षमतेचा वापर करू इच्छित आहे.

ते म्हणाले, यूएस मधील मर्क लसीसाठी अंदाजे 700 डॉलर पेक्षा कमी खर्च येईल. कारण यूएसमध्ये ती इतर अनेक कारणांसाठी महाग आहे. केवळ उत्पादन खर्चामुळे नाही. मला वाटते जेव्हा भारत सरकार यावर काम करेल तेव्हा ते या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करतील आणि अर्थातच त्यांच्या दोन प्रकारच्या किंमत असतील. सुरुवातीला त्याची किंमत 2000 ते 3000 हजार किंवा संपूर्ण उपचारासाठी 4000 रुपये असू शकते. मात्र, नंतर ही किंमत 500 ते 600 किंवा 1,000 रुपयांपर्यंत खाली येईल. असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT