भारतात बनवलेल्या कोरोना लसीला मिळाले मोठे यश

जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली नसून कोवॅक्सीनबद्दल अधिक माहितीची मागणी केली आहे.
भारतात बनवलेल्या  Coronavirus vaccine मिळाले मोठे यश
भारतात बनवलेल्या Coronavirus vaccine मिळाले मोठे यश Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतात बनवलेल्या कोरोना लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मान्यता दिली नाही. पण ऑस्ट्रेलियन सरकारने भारत बायोटेकने बनवलेल्या कोवॅक्सीनला मान्यता दिली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ फारेल यांनी दिली आहे. कोवॅक्सीनला ऑस्ट्रेलियन सरकारकडून मान्यता मिळाली आहे पण अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली नसून अधिक माहिती देण्याची मागणी केली आहे.

जागतिक संस्थेचे असे म्हणणे आहे की, त्यानं या लसीबद्दल अधिक माहिती मिळणे आवश्यक आहे. या आधारेच लसीच्या वापरास मान्यता दिली जाऊ शकते. यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक झाली होती, ज्यामध्ये या लसीला मान्यता मिळणे अपेक्षित होते पण असे झाले नाही. आता 3 नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या लसीला मान्यता मिळू शकते. यांचा वर्षी 19 एप्रिल रोजी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. ही लस भारत बायोटेक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मदतीने तयार केली आहे.

भारतात बनवलेल्या  Coronavirus vaccine मिळाले मोठे यश
सरदार पटेल, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना म्हणत अखिलेश यादवांनी काढली जीनांची आठवण

कोविशील्ड लसीला ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. आतापर्यंत भारतातील 90 टक्के लोकांना फक्त कोविशील्ड देण्यात आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन सरकारने फाजझर, जॉन्सस अँड जॉन्सस, मॉडर्ना, सिनोव्हॅक, सिनोफार्म आणि भारत बायोटेक या लसींना मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dharmendra Pradhan Reaction
Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
Constitutional right to protest India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com