Vaccination Dainik Gomantak
देश

Vaccination: 12 ते 14 वयोगटातील मुलांना उद्यापासून मिळणार Corbivax लसीचा डोस

केंद्र सरकारने (Central Government) आता देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने आता देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. या बालकांना बुधवार, 16 मार्चपासून लसीकरण करण्यात येणार आहे. या मुलांना Corbivax चा एकच डोस देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी या लसीकरण (Vaccination) मोहिमेबाबत राज्यांना सूचनाही दिल्या आहेत. सध्या देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि 18 वर्षांवरील प्रौढ व्यक्तींसाठी स्वतंत्रपणे लसीकरण सुरु आहे. (Corbivax vaccine will be given to children between the ages of 12 and 14 from tomorrow)

दरम्यान, राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात भूषण यांनी म्हटले आहे की, 12 ते 13 वर्षे आणि 13 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना Corbivax ची लस दिली जाईल. तर 14 ते 15 वयोगटातील बालकांचा समावेश 15 ते 18 वयोगटातील बालकांच्या लसीकरणात यापूर्वीच करण्यात आला आहे. या वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॉक्सिन ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची लस दिली जात आहे.

60 वर्षांवरील नागरिकांसाठी डोस

आरोग्य सचिवांनी पुढे सांगितले की, ‘60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांसाठी डोस दिले जातील. यामध्ये, दुसरा डोस घेतल्यानंतर नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. यापूर्वी लसीकरणासाठी वापरलेल्या लसीचाच वापर करण्यात येणार आहे.’

Corbivax लस बायोलॉजिक्स ई ने विकसित केली आहे. अलीकडेच या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने (Central Government) कंपनीला पाच कोटी लसी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने त्यांचा पुरवठाही सरकारला सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT