देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजूनही टळलेला नाही. केंद्र सरकार वेळोवेळी कोरोनापासून संरक्षणासाठी नव नवीन गाइडलाईन्स जाहारी करत आहे. तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणात लसीकरणावर (Vaccination) भरही देण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करुन एक मोठी घोषणा केली आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरु होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित राहील, असंही ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. (Children between the ages of 12 and 14 will receive the corona vaccine from March 16)
मांडवीय पुढे म्हणाले, ''मला कळविण्यात आनंद होत आहे की 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होत आहे. तसेच, 60+ वयोगटातील सर्व लोकांना आता डोस मिळू शकतील. मी मुलांच्या कुटुंबींयाना आणि 60+ वयोगटातील नागरिकांना विनंती करतो की, त्यांनी तात्काळ कोरोनाची लस घ्यावी.''
दरम्यान, मार्चच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री म्हणाले होते की, ''देशातील 15 ते 18 वयोगटातील तीन कोटींहून अधिक किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पुढील स्तरावर घेऊन जात आहे. मांडविया यांनी ट्विट करत म्हटले होते की, 15 ते 18 वर्षे वयोगटातील 30 दशलक्षाहून अधिक किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पुढील स्तरावर घेऊन जात आहे! सर्वाना लस मोफत.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.