Copies of correspondence between former Goa Governor Satyapal Malik PM modi and Shah are not available Dainik Gomantak
देश

मलिक यांनी मोदी व शहा यांच्याशी केलेल्या ‘त्या’ पत्रव्यवहाराच्या प्रती उपलब्ध नाहीत

अशा गोपनीय आणि वैयक्तिक पत्रव्यवहाराच्या प्रती सहसा राज्यपालांच्या सचिवालयाला दिल्या जात नाहीत,

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Goa Governor Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी माहिती हक्क कायद्याखाली मागितली होती. राजभवनच्या कार्यालयातर्फे या पत्रव्यवहाराच्या प्रती उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.

नोव्हेंबर 2019 ते 18 ऑगस्ट 2020 या काळात राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पत्रव्यवहारासंदर्भातच्या सर्व फाईल्स न्याहाळण्यात आल्या. तसेच शोध घेण्यात आला. मात्र, त्यामध्ये काही सापडले नाही, राज्यपालांना थेट उच्च अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याची व्यवस्था आहे आणि अशा गोपनीय आणि वैयक्तिक पत्रव्यवहाराच्या प्रती सहसा राज्यपालांच्या सचिवालयाला दिल्या जात नाहीत, असे राजभवनच्या माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

उत्तराविरोधात अपिल करणार: ॲड. रॉड्रिग्ज

राजभवनच्या माहिती अधिकाऱ्यांकडून जे उत्तर माहिती हक्क कायद्याखाली मागितलेल्या पत्रावर देण्यात आले आहे ते समाधानी नाही. त्यामुळे या उत्तराविरोधात अपिल करण्यात येणार आहे. राज्यपालांनी भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध जी माहिती पत्र पाठवून केंद्राला दिली होती ती उघड केली जात नाही. ही माहिती राजभवनच्या कार्यालयाचा दस्तावेज असल्याने ही माहिती उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. ही पत्रे राजभवनमधून गायब कशी झाली हे कोडे आहे. ही माहिती उपलब्ध केल्यास भाजप सरकारने केलेल्या गैरव्यवहाराचा उलगडा होऊ शकतो. या पत्रव्यवहाराच्या प्रती शोधण्यास मी स्वतः मदत करू शकतो, असे ॲड. रॉड्रिग्ज म्हणाले.https://www.youtube.com/watch?v=0-kczstlN-A

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT