Cooper Connolly Dainik Gomantak
देश

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Cooper Connolly Record: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी पराभव करुन एक अविश्वसनीय कामगिरी केली.

Manish Jadhav

Cooper Connolly Record: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी पराभव करुन एक अविश्वसनीय कामगिरी केली. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला मालिका 1-2 ने गमवावी लागली असली तरी, शेवटच्या सामन्यातील हा मोठा विजय त्यांच्यासाठी प्रतिष्ठा वाचवणारा ठरला. मॅके येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने केवळ दोन गडी गमावून 431 धावांचा विशाल स्कोअर उभा केला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी वादळी सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 250 धावांची विक्रमी भागीदारी रचली.

ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांची शतकी खेळी

दरम्यान, या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 103 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 142 धावांची तुफानी खेळी केली. तर, कर्णधार मिचेल मार्शने 106 धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली, ज्यात 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. यानंतर कॅमेरुन ग्रीन आणि ॲलेक्स कॅरी यांनी संघाला आणखी मजबूती दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 164 धावांची भागीदारी केली. ग्रीनने केवळ 55 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 118 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, ॲलेक्स कॅरीने 50 धावांचे योगदान दिले.

कूपर कोनोलीचा धमाका!

432 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे पूर्णपणे गडगडला आणि केवळ 24.5 षटकांत 155 धावांवर सर्वबाद झाला. या मोठ्या विजयाचा नायक ठरला 22 वर्षांचा युवा फिरकीपटू कूपर कोनोली. त्याने 6 षटकांत 22 धावा देत 5 बळी घेत इतिहास रचला. शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोनोलीने 38 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 5 बळी घेणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला. कोनोलीने क्रेग मॅकडरमॉट यांचा विक्रम मोडला. क्रेग मॅकडरमॉट यांनी 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लाहोर येथे 22 वर्षे आणि 204 दिवसांच्या वयात 5 बळी घेतले होते. तर, कूपर कोनोलीने वयाच्या केवळ 22 वर्षे आणि 2 दिवसांत हा मोठा पराक्रम केला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 5 बळी घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज

  • 22 वर्षे 2 दिवस – कूपर कोनोली विरुद्ध दक्षिण आफ्रिका | मॅके, 2025

  • 22 वर्षे 204 दिवस – क्रेग मॅकडरमॉट विरुद्ध पाकिस्तान | लाहोर, 1987

  • 22 वर्षे 211 दिवस – मिचेल स्टार्क विरुद्ध पाकिस्तान | शारजाह, 2012

एकंदरीत, ऑस्ट्रेलियाने (Australia) या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आणि मालिकेचा शेवट मोठ्या विजयाने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT