constable wife kidnapping case Dainik Gomantak
देश

बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय; कॉन्स्टेबल पत्नीने पती आणि घरातील कामवालीचे केले अपहरण

Andhra Pradesh Crime News: लग्नाच्या काही काळानंतर पतीचे बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय पत्नी मंजुळाला येऊ लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

आंध्र प्रदेश: पतीचे बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय आल्याने पत्नीने पती आणि घरातील कामवालीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या सासूने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बुधवारी (१५ ऑक्टोबर) हा प्रकार उघडकीस आला. महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. आंध्रप्रदेश राज्यातील सत्य साई जिल्ह्यातील कादिरी येथे ही घटना घडली.

मंजुळा असे अपहरणकर्त्या पोलिस कॉन्स्टेबल महिलेचे नाव आहे. तिरुपती जिल्ह्यातील तिरुचानूर पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. तर, तिचा पती एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पाच वर्षापूर्वी दोघांचा विवाह झाला होता. पण, कामामुळे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.

पत्नी मंजुळा तिरुपती येथे राहते तर पती आई – बाबांसोबत एनजीओ कॉलनी कादिरी येथे वास्तव्यास आहे. लग्नाच्या काही काळानंतर पतीचे बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय पत्नी मंजुळाला येऊ लागला.

मंगळवारी (१४ ऑक्टोबर) मंजुळा पंधरा लोकांसमवेत पतीच्या घरात घुसली आणि तिने पतीसह घरातील कामवालीचे अपहरण केले. यानंतर पतीच्या आईने कादिरी पोलिस स्थानकात अपहरणाची तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर या घटनेमागील सत्य समोर आले आहे. मंजुळा लोकांना घेऊन घरात घुसली त्यावेळी तिने पतीच्या आई – वडिलांना मारहाण केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अफेअरच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असून, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT