Consent once given does not license person to continue physical, mental and sexual abuse, says Mumbai High Court. Dainik Gomantak
देश

एकदा दिलेली संमती व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण सुरू ठेवण्याचा परवाना देत नाही: हायकोर्ट

आरोपी आणि पीडितेचे लग्न झाले आहे. हा बलात्कार नसून दोन प्रौढांमधील विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण आहे. दोघेही पोलीस खात्यात आहेत. दोघांचे संबंध सुरुवातीपासूनच सहमतीचे होते, असे आरोपीचे वकील म्हणाले.

Ashutosh Masgaunde

Consent once given does not license person to continue physical, mental and sexual abuse, says Mumbai High Court:

मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात दोन प्रौढांमधील सहमतीने असलेल्या संबंधांबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, अशा प्रकरणात प्रारंभिक संमती व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण सुरू ठेवण्याचा परवाना देत नाही. एका पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी म्हटले आहे की, जेव्हा नातेसंबंधात दुरावा येतो तेव्हा आरोप वेगाने पसरतात, परंतु सध्याच्या प्रकरणातील तथ्य पाहता आरोपीला जामीन देणे म्हणजे पीडितेचे आणि तपासाचे हित धोक्यात आणण्यासारखे आहे.

प्रथमदर्शनी, आरोपांशी संबंधित सामग्री विश्वासार्ह असल्याचे दिसते, त्यामुळे आरोपींना दिलासा देण्याचा अधिकार वापरता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या पीडितेने आरोपींच्या धमक्यांना कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या कृत्यामुळे त्याच्या घरात कलह सुरू झाला.

आरोपीने पीडितेला अंमली पदार्थ आणि गोळ्या देऊन तिचे लैंगिक शोषण केले. घटस्फोट न घेतल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. पुढे त्याने पीडितेला आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो सतत तिचे लैंगिक शोषण करत होता.

या प्रकरणाकडे विवाहबाह्य संबंधांच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

सरकारी वकील पुढे म्हणाले, आरोपीचे हिंसक वर्तन आणि धमकावणारे वर्तन यासंबंधी भरपूर पुरावे आहेत. हातात बंदूक घेऊन धमकी देणारा व्हिडिओ आरोपीने पीडितेला पाठवला होता.

या खटल्यातील आरोपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, आरोपी आणि पीडितेचे लग्न झाले आहे. हा बलात्कार नसून दोन प्रौढांमधील विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण आहे. दोघेही पोलीस खात्यात आहेत. दोघांचे संबंध सुरुवातीपासूनच सहमतीचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT