Himachal Pradesh Election Result: एकीकडे भाजप काँग्रेसमुक्त भारतचा नारा देत असतो पण तरीही कुठेना कुठे पुन्हा काँग्रेसची सत्ता येत असते. आताही गुजरातमध्ये ऐतिहासिक मोठ्या विजय मिळवुनही भाजपला हिमाचल प्रदेशसारख्या छोट्या राज्यातील सत्ता राखण्यात अपयश आले आहे. येथे काँग्रेसने मुसंडी मारत 40 जागा जिंकल्या आहेत.
हिमाचल प्रदेशात भाजपला 25 जागांवर समाधान मानून घ्यावे लागले आहे. राज्यात विधानसभेच्या एकुण 68 जागा आहेत. बहुमतासाठी 35 जागांची गरज आहे. दरम्यान, भाजपचे 11 पैकी 8 विद्यमान मंत्र्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये सरकार बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या, शुक्रवारी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवणार आहे. त्यासाठी निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 2017 च्या तुलनेत भाजपला 19 जागांचे नुकसान झाले आहे. तीन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करणाऱ्या आम आदमी पक्षाला येथे खातेही खोलता आलेले नाही.
हिमाचल प्रदेशात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत 45 से 75 टक्के मंत्री पराभूत होण्याचा इतिहास आहे. तो या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. यावेळी 11 पैकी 8 मंत्री पराभूत झाले आहेत. पराभूत होणाऱ्या मंत्र्यांमध्ये सुरेश भारद्वाज, रामलाल मारकंडा, वीरेंद्र कंवर, गोविंद सिंह ठाकुर, राकेश पठानिया, डॉ. राजीव सैजल, सरवीण चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा समावेश आहे. जिंकणाऱ्या मंत्र्यांमध्ये केवळ मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्यासह बिक्रम ठाकुर आणि सुखराम चौधरी यांचाच समावेश आहे.
हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तसेच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा या बैठकीत सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाचा विचार सुरू आहे. प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आणि मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.