Congress MP Imran Masood Dainik Gomantak
देश

Bhagat Singh Controversy: शहीद भगतसिंगांची तुलना थेट 'हमास'शी! काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्या वक्तव्याने राजकीय वादंग; भाजपने घेतलं फैलावर VIDEO

Congress MP Imran Masood Controversial Statement: काँग्रेस खासदार इम्रान मसूद (Imran Masood) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Manish Jadhav

Congress MP Controversial Statement: काँग्रेस खासदार इम्रान मसूद (Imran Masood) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका पॉडकास्ट शोमध्ये बोलताना त्यांनी शहीद भगतसिंग यांची तुलना थेट दहशतवादी गट 'हमास' (Hamas) या संघटनेशी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशात नवा राजकीय वाद निर्माण झाला असून भाजपने काँग्रेस खासदारावर जोरदार टीका केली.

नेमके काय म्हणाले इम्रान मसूद?

सहाराणपूरचे काँग्रेस (Congress) खासदार इम्रान मसूद नुकतेच एका पॉडकास्ट शोमध्ये सहभागी झाले होते. शोच्या अँकरने जेव्हा इम्रान यांना 'हमास ही एक दहशतवादी संघटना आहे' असे म्हटले, तेव्हा मसूद भडकले. मसूद यांनी त्वरित प्रश्न केला, "अहो, तुम्ही काय बोलत आहात? मग काय भगतसिंग देखील दहशतवादी होते?" अँकरने या विधानावर आक्षेप घेत भगतसिंग आणि हमासची तुलना होऊ शकते का, असा प्रश्न विचारला. त्यावर मसूद ठामपणे म्हणाले, "हो, नक्कीच, मी अगदी बरोबर बोलत आहे."

इम्रान मसूद यांनी आपल्या विधानाचे समर्थन करताना म्हटले, "ते (हमास) त्यांच्या जमिनीसाठी लढत आहेत. भगतसिंगही त्यांच्या जमिनीसाठी लढत होते. भगतसिंगही त्यांच्या जमिनीसाठी शहीद झाले." इम्रान मसूद यांच्या मते, इस्त्रायलने गाझावर कब्जा केला आहे.

जेव्हा अँकरसोबत या विषयावर वाद वाढू लागला, तेव्हा काँग्रेस खासदाराने म्हटले की, "तुमच्यासाठी हमास एक दहशतवादी संघटना असेल पण माझ्या मते हमास (Hamas) आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. तुम्ही त्यांच्याद्वारे ओलीस बंधक ठेवलेल्या 250 लोकांना पाहत आहात, पण इस्त्रायलने मारलेल्या 1 लाख लोकांना तुम्ही पाहत नाही."

भाजपची तीव्र प्रतिक्रिया

इम्रान मसूद यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपने (BJP) तीव्र आक्षेप घेतला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरुन टीका केली. पूनावाला यांनी लिहिले की, "बोटी-बोटी वाले इम्रान मसूद हमासची तुलना भगतसिंगांशी करत आहेत. हा सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे."

पूनावाला यांनी पुढे म्हटले की, लेफ्ट आणि काँग्रेस दहशतवादी समूहांचे उदात्तीकरण करतात आणि गांधी कुटुंबाला महान दाखवण्यासाठी आपल्या सर्व नायकांना कमी लेखतात. यापूर्वी कन्हैया कुमारनेही भगतसिंग यांची तुलना लालू यादव यांच्याशी केली होती, याची आठवणही त्यांनी करुन दिली. काँग्रेसने यापूर्वीही चंद्रशेखर आझाद, सावरकर, सरदार पटेल, बिरसा मुंडा यांचा अपमान केला असल्याचे देखील यावेळी पूनावाला यांनी म्हटले.

हमास-इस्त्रायल संघर्षाची पार्श्वभूमी

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 1200 हून अधिक लोक मारले गेले आणि 250 लोकांना हमासने ओलीस ठेवले. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या इस्त्रायलने हमासविरुद्ध युद्ध पुकारले. इस्त्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरु केली, ज्यात 67,000 हून अधिक पॅलेस्टिनी लोक मारले गेले आणि एक गंभीर मानवीय संकट निर्माण झाले. या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका भारतीय खासदाराने स्वातंत्र्यसैनिक आणि दहशतवादी संघटनेची तुलना करणे, हा गंभीर राजकीय मुद्दा बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसचे 'वरिष्ठ' नेते येणार गोव्यात! गोवा फॉरवर्डची यादीही रखडली; भाजपचा 7 अपक्षांना पाठिंबा

धक्कादायक! पाकिस्तानचे हेरगिरी जाळे गोव्‍यात उद्‌ध्‍वस्‍त, माजी सुभेदारासह महिला अटकेत; संवेदनशील माहिती पाठवल्याचा संशय

Horoscope: भावनिक निर्णय टाळा, नवे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ; 'या' राशीच्या लोकांसाठी विशेष ठरतोय आजचा दिवस

आईचा खून करुन मृतदेहाचे 16 तुकडे केले, उलट्या काळजाच्या मुलाला कोर्टाने ठोठावली जन्मठेप

अर्जुन तेंडुलकरविरुद्ध वैभवनं आक्रमक फलंदाजी केली, पण बिहार हरला; धमाकेदार सामन्यात गोव्याने नोंदवला शानदार विजय!

SCROLL FOR NEXT