Congress MP Shashi Tharoor Dainik Gomantak
देश

Shashi Tharoor: कॉंग्रेस नेते शशी थरुर 'हे' डिवाइस गळ्यात का घालतात, जाणून घ्या खासियत

Congress MP Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या गळ्यात तुम्ही एक छोटेसे डिवाइस पाहिले असेल.

दैनिक गोमन्तक

Congress MP Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या गळ्यात तुम्ही एक छोटेसे डिवाइस पाहिले असेल. तुम्हाला या डिवाइसबद्दल माहिती आहे का, हे डिवाइस काय आहे आणि ते कसे काम करते. तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शशी थरुर यांच्या गळ्यातील हे डिवाइस दुसरे तिसरे काही नसून 'एअर प्युरिफायर' आहे. हे पर्सनल एअर प्युरिफायर आहे, जे हवा स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते.

दरम्यान, भारतातही तुम्ही हे डिवाइस बाजारातून खरेदी करु शकता. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरुन पुन्हा एकदा चर्चेत आले. जर तुम्ही त्यांचे काही फोटो बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की थरुर यांच्या गळ्यात एक डिवाइस दिसेल.

तसे, हे आवश्यक नाही की याकडे आपले लक्ष गेले पाहिजे. कारण हे गॅझेट आकाराने खूपच लहान आहे. ते एखाद्या नेकलेस किंवा त्याऐवजी जुन्या पद्धतीच्या नोकिया फोन्ससारखे आहे. हे छोटे डिवाइस एअर प्युरिफायर आहे. हे पर्सनल डिवाइस त्यांचे प्रदूषणापासून (Pollution) संरक्षण करते. जे लोक खूप जास्त प्रवास करतात त्यांच्यासाठी हा एअर प्युरिफायरचा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे एअर प्युरिफायर मिळतात. यामध्ये पोर्टेबल किंवा वेअरेबल एअर प्युरिफायरचाही समावेश आहे.

दुसरीकडे, या पोर्टेबल एअर प्युरिफायरचे वजनही खूप कमी आहे. त्याच्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास, तुम्ही 8000 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत एक चांगला वेअरेबल एअर प्युरिफायर खरेदी करु शकता. यामध्ये एलईडी लाईट देण्यात आली आहे. शशी थरुर यांच्या गळ्यातील हे डिवाइस फोन नसून एअर प्युरिफायर आहे. हे एक हवा शुद्ध करणारे आहे, डॉक्टर बऱ्याचदा एअर प्युरिफायर वापरण्याची लोकांना शिफारस करतात. थरुर यांच्या गळ्यात लटकत असलेले हे डिवाइस AirTamer ब्रँडचे आहे. याचा एक प्रकार Amazon.in वर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. AirTamer A310 हे रिचार्ज करण्यायोग्य पर्सनल एअर प्युरिफायर आहे.

या डिवाइसची वैशिष्ट्ये जाणून घ्या

तुम्ही Amazon वरुन AirTamer A310 ऑनलाइन 9,999 रुपयांना खरेदी करु शकता. कूपनवर 1000 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही ते ब्लॅक आणि व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करु शकता. हे डिवाइस HEPA फिल्टरसह येते, जे वापरकर्त्याला स्वच्छ हवा पोहोचवण्याचे काम करते. डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, बॅटरी समाविष्ट केली आहे, जी तुम्ही USB चार्जरच्या मदतीने चार्ज करु शकता. यात पॉवर ऑन/ऑफ बटण आहे. त्याचे वजन सुमारे 50 ग्रॅम असून ते नियंत्रित करण्यासाठी, आपल्याला अॅप वापरावे लागते. या डिवाइसचे उत्पादन अमेरिकेत होते. तुम्ही ते Amazon वरुन कूपन डिस्काउंट आणि बँक ऑफरसह खरेदी करु शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लोकांनी या उत्पादनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT