...त्यांचा उत्साहचं भाजपच्या विजयाचं मोठं श्रेय: शशी थरुर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly elections) भाजपच्या विजयाचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदींना देत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Shashi Tharoor
Shashi Tharoor Dainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदींना देत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी त्यांचे कौतुक केले आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी यूपी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर म्हटले, 'भाजपला एवढा मोठा जनादेश मिळेल अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती.' थरुर पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड उत्साही व्यक्ती आहेत". त्यांच्यात व्यक्तीमत्वात अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप प्रभावशाली आहेत, विशेषतः राजकीयदृष्ट्या. त्यांचा पक्ष एवढ्या मोठ्या फरकाने विजयी होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु त्यांनी ते साध्य केले.'' (Shashi Tharoor attributed the BJPs victory in the Assembly elections to Prime Minister Modi)

एक्झिट पोलचा अंदाज

यूपीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलच्या या अंदाजावर थरुर म्हणाले, "एक्झिट पोल येईपर्यंत माझ्या मनात एकही प्रश्न नव्हता. बहुतेक लोकांना अटीतटीची लढाई होईल अशी अपेक्षा होती. काही लोक समाजवादी पार्टी पुढे असल्याचे देखील सांगत होते. परंतु 10 मार्च रोजी आलेल्या निकालानंतर भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत प्राप्त करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. दुसरीकडे विचार केल्यास समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) जागा वाढल्या आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसतील."

Shashi Tharoor
पेच कायम! यूपीत होऊ शकतात 2 हून अधिक उपमुख्यमंत्री

एक दिवस जनतेला धक्का बसेल

काँग्रेस नेते शशी थरुर पुढे म्हणाले, ''एक दिवस मतदार भारतीय जनता पक्षाला मोठा झटका देईल. परंतु आज लोकांनी त्यांना बहुमत दिले आहे. मात्र भारतीय जनता पक्ष देशात जातीय आणि धार्मिक आधारावर विभाजन करत आहेत. जे की दुर्दैवी आहे".

Shashi Tharoor
पेच कायम! शपथविधी लांबणीमुळे भाजपामध्ये अस्वस्थता

प्रियांका गांधींनी परिश्रम घेतले

यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल बोलताना थरुर म्हणाले की, ''प्रियांका गांधी वाड्रा यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी पक्षासाठी दमदार प्रचार केला आहे. कोणत्याही एका व्यक्तीच्या प्रचाराच्या आधारे काँग्रेसला दोष देता येईल, असे मला वाटत नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com