Gaurav Pandhi Dainik Gomantak
देश

Atal Bihar Vajpayee: 'अटलबिहारी वाजपेयी ब्रिटिशांचे गुप्तहेर होते...', काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

Congress: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 1924 साली आजच्या दिवशी झाला होता. तमाम राजकारण्यांनी 'सदैव अटल' (दिल्ली) येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

दैनिक गोमन्तक

Gaurav Pandhi On Atal Bihar Vajpayee: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 1924 साली आजच्या दिवशी झाला होता. तमाम राजकारण्यांनी 'सदैव अटल' (दिल्ली) येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही सोमवारी (26 डिसेंबर) अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने वाजपेयी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे समन्वयक आणि काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीच्या दिवशीच 'ब्रिटीश गुप्तहेर' म्हटले. गौरव पांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, "1942 मध्ये, इतर सर्व RSS सदस्यांप्रमाणे, अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत छोडो आंदोलनावर बहिष्कार टाकला आणि चळवळीत सहभागी झालेल्यांविरुद्ध ब्रिटिश ‍गुप्तहेर म्हणून काम केले."

'वाजपेयींनी जमावाला भडकवले'

गौरव पांधी इथेच थांबले नाहीत, त्यांनी ट्विटरवर पुढे लिहिले की, "नेल्ली हत्याकांड असो किंवा बाबरी विध्वंस असो, वाजपेयींनी जमावाला भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती...''

काय म्हणाले सोशल मीडिया यूजर्स?

गौरव पांधी यांच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत. युजर @श्यांतसाओ यांनी लिहिले की, "निःसंशय... पण प्रश्न असा आहे की, 2014 पूर्वी ही वस्तुस्थिती कुठे होती? जर त्यांनी नेल्लीसारखे जघन्य पाप केले असेल तर काँग्रेसने (Congress) त्यांना विरोध का केला नाही? कारवाई का झाली नाही? काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुठे होते? गांधींसह इतर नेते अजूनही त्यांचा आदर करतात का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

SCROLL FOR NEXT