Main Atal Hoon: शांत, अभ्यासु, राजकारणी, पंतप्रधान… पाहा ‘मैं अटल हूँ’ तील पंकज त्रिपाठींची पहिली झलक

शांत, अभ्यासु, कवी आणि राजकारणी अशी ओळख असलेले देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत अटलजी यांच्या जयंतीनिमित्त बायोपीकचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.
Main Atal Hoon | Pankaj Tripathi
Main Atal Hoon | Pankaj Tripathi Dainik Gomantak

शांत, अभ्यासु, कवी आणि राजकारणी अशी ओळख असलेले देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत अटलजी यांची आज ९८ वी जयंती साजरी केली जात आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त 'मै अटल हूं' चित्रपटामधील पकंज त्रिपाठी यांचा पहिला लुक रिलीज झाला आहे.

अटलजींच्या जीवनावर आधारित लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सोशल मिडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पंकज त्रिपाठी यांनी एनेक भुमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार भुमिकांनी त्यांनी प्रत्येक भूमिकेला चार चांद लावले आङेत. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. पंकज त्रिपाठी यांनी एक व्हिडीओ शेअर करत, ‘मैं अटल हूं’चा फर्स्ट लुक दाखवला आहे. ‘अटलजींची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी मला संयमपूर्ण माझ्या व्यक्तिमत्त्वावर काम करण्याची गरज आहे. मी या नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेल हा अटल विश्वास मला आहे,’ असं त्यांनी या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com