Digvijay Singh Dainik Gomantak
देश

"भक्तांनो गप्प का आहात ?" तालिबान प्रकरणावरुन कॉंग्रेस नेते कडाडले

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान (Taliban) आणि अफगाण सैन्यांमधील रक्तरंजित चकमक अजूनही सुरूच आहे. या मुद्द्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने घेतलेल्या भुमिकेवर कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी जोरदार टीका केल्याचे पहायला मिळते आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज तालिबान प्रकरणात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या भुमिकेवर निशाणा साधताना मोदी आणि शाह यांनी अफगाणिस्तानला मदत न करण्याची भुमिका घेतल्याने तालिबान्यांना मदत होत असल्याचा आरोप केला. (Congress leader Digvijay Singh has strongly criticized the Narendra Modi government's stance on the Taliban issue.)

या प्रकरणावरुन दिग्विजय सिंह यांनी सरकार सोबतच नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांवर देखील टीका केल्याचे पहायला मिळते आहे. यावेळी टीका करताना त्यांनी ट्विट करत 'मोदी भक्त तुम्ही या वृत्तावर गप्प का आहात? सरांचा मेसेज आला नाही का? भाजप, मोदी, शाह सरकार तालिबान्यांशी चर्चा करत आहेत. इम्रान खान साहेबही तालिबान्यांवर दयाळूपणे वागतात. भाजपा-मोदी-शाह आणि इम्रान खान अफगाणिस्तानातील निवडलेल्या सरकारला मदत न केल्याने तालिबानचा मार्ग मोकळा करत आहेत असे दिसते.” असे गंभीर आरोप केले आहे.

तत्पूर्वी, कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी शनिवारी सांगितले की, जोपर्यंत पाकिस्तानचे इम्रान खान सरकार मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर आणि भारताविरूद्धच्या इतर दहशतवादी कृत्यांविरूद्ध कठोर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू होऊ शकणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT