ओवैसींच्या MIM पक्षाचे ट्विटर अकाउंट हॅक; 'एलॉन मस्कचे' दिले नाव

हॅकर्सने AIMIMच्या या ट्विटर हॅेडलवर एलॉन मस्क (Elon Musk) यांचा फोटो का लावला असावा हे मात्र समजु शकलेले नाही.
AIMIM President Asaduddin Owaisi And Elon Musk
AIMIM President Asaduddin Owaisi And Elon MuskDainik Gomantak
Published on
Updated on

असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या पार्टी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (AIMIM) चे व्हेरिफाईड ट्विटर (Twitter) हँडल हॅक (Hack) करण्यात आले. हॅकर्सनी या अकाउंटचे नाव बदलून ‘एलॉन मस्क' केले आणि एलॉन मस्क यांचा फोटो प्रोफाईल फोटो ठेवण्यात आला आहे. एलॉन मस्क हे जगभरात प्रसिद्ध असलेले एक व्यक्तीमत्व असुन टेस्ला कंपनीचे ते मालक आहेत. (AIMIM party Twitter account has been hacked)

AIMIM Twitter Account
AIMIM Twitter Account Dainik Gomantak

रविवारी हे अकाउंट हॅक झाले असुन अद्याप पर्यंत (4:40 वाजेपर्यंत) ते अकाउंट पुर्ववत करण्यात आलेले नाही. हॅकर्सने एलॉन मस्क यांचा फोटो का लावला असावा हे मात्र समजु शकलेले नाही. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र यावरुन वेगवेळे मीम तयार केले असल्याचे पहायला मिळते आहे.

AIMIM President Asaduddin Owaisi And Elon Musk
ICMR नवा स्टडी, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका फारच कमी

दरम्यान हे अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यावरुन क्रिप्टोकरंसीशी संबंधीत काही मजकुर टाकण्यात आला आहे. हे अकाउंट हॅक का करण्यात आले किंवा त्यामागचा हेतु काय हे अद्याप समजु शकलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com