Congress Dainik Gomantak
देश

भाजप विरोधात कॉंग्रेसची सोशल मीडियावर मोहीम सुरू

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग झाल्यानंतर सुरू झालेला राजकीय वाद अद्याप संपलेला नाही. या मुद्द्यावरून भाजप आणि कॉंग्रेसचे नेते एकमेकावर चिखलफेक करत आहेत. भाजप (BJP) हा मुद्दा जनतेत जोरात मांडत असतानाच आता काँग्रेसने (Congress) उलट रणनीती म्हणून सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. (Congress launches a social media campaign against BJP)

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा उद्देश केवळ देशाचे लक्ष खर्‍या मुद्द्यांवरून वळवण्याचा नाही तर पंजाबमधील मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्याचाही आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार (Central Government) लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया मोहिमेत नोटाबंदी, साथीच्या रोगाचे व्यवस्थापन, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची दुर्दशा, शेतकऱ्यांचे प्रश्न, लखीमपूर खेरी हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. गेल्या सात वर्षांपासून देश ज्या खर्‍या समस्यांना तोंड देत आहे, त्याकडे देशाचे लक्ष वेधणे हा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

SCROLL FOR NEXT