Cockroach found in passenger's food in Vande Bharat Express  X, @iamdrkeshari
देश

Viral: आता वंदे भारत एक्सप्रेसमध्येही... जेवण्यात झुरळ सापडल्याने प्रवाशाचा संताप

IRCTC: एखाद्या प्रवाशाला ट्रेनमधून प्रवास करताना असा त्रासदायक प्रसंग अनुभवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत.

Ashutosh Masgaunde

Cockroach found in passenger's food in Vande Bharat Express Doctor from Madhya Pradesh has exposed the incident by posting on X:

भारतीय रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत प्रवाशांकडून सतत तक्रारी येत असतात. आता ताजे प्रकरण वंदे भारत एक्स्प्रेसचे आहे, ज्यामध्ये प्रवाशाच्या जेवणात झुरळ आढळून आले.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील डॉक्टर शुभेंदू केसरी यांनी X वर पोस्ट करत ही घटना उघडकीस आणली आहे. या घटनेचा उल्लेख त्यांनी रेल्वेच्या तक्रार पुस्तकात केला आहे.

1 फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डॉ. शुभेंदू यांनी सांगितले की, वंदे भारत रेल्वेमधून ते १ फेब्रुवारी रोजी राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून जबलपूरला जात होते.

त्यांनी तिकिटाद्वारे जेवणाची ऑर्डर दिली होती. जेव्हा अन्न त्याच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना बटाट्याच्या करीमध्ये मेलेले झुरळ दिसले.

शुभेंदू यांनी X वर जेवणाचे फोटो शेअर केले. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) याबद्दल खेद व्यक्त करत संबंधित संस्थेला दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले.

IRCTC ने या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. या वाईट प्रकारासाठी त्यांनी प्रवाशाची माफी मागितली. “सर, तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही माफी मागतो. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून, संबंधित सेवा पुरवठादाराला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे, असे त्यांनी लिहिले.”

एखाद्या प्रवाशाला ट्रेनमधून प्रवास करताना असा त्रासदायक प्रसंग अनुभवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

जुलै 2023 मध्ये, एका प्रवाशाने भोपाळ ते ग्वाल्हेर या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये दिलेल्या रोटीमध्ये झुरळाचा फोटो शेअर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT