IRCTC Goa Package: नवीन वर्षात कमी बजेटमध्ये गोव्याची ट्रिप करायची आहे? मग 'हे' पॅकेज पाहाच...

22 जानेवारीपासून सुरवात
IRCTC Goa Packages
IRCTC Goa PackagesDainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Goa Package: नवीन वर्षात गोव्याची मजा अनुभवायची आहे, तीही कमी बजेटमध्ये. त्यामुळे आयआरसीटीसी प्रवाशांना अत्यंत कमी खर्चात गोव्याला घेऊन जाईल. IRCTC ने नवीन वर्षासाठी गोवा ट्रिप 'न्यू इयर बोनान्झा इन गोवा' पॅकेज आणले आहे. यात तुम्ही तुमच्या मित्रांसह बूक करू शकता.

गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. एवढेच नाही तर येथील नाईट लाईफ आणि बीच कल्चर, पार्टी कल्चर पर्यटकांना खूप आकर्षित करते. मात्र, नववर्षाला गोव्याला जाण्याचा अनेकांचा बेत असतोही, पण डिसेंबरचा काळ हा गोव्यातील पर्यटनाचा पीक सीझन असतो.

सध्या IRCTC ने नववर्षानिमित्त प्रवाशांसाठी अशी ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये गोव्यात प्रवास करू शकाल.

IRCTC Goa Packages
Goa State Debt: गोव्याचे कर्ज 35 हजार कोटींवर; राज्यातील प्रत्येक नागरीकावर 2.2 लाख रुपयांचा बोजा

पॅकेजची सुरूवात कधी होणार?

हा दौरा 22 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. IRCTC ने या टूरला 'न्यू इयर बोनान्झा इन गोवा' (EGA013B) असे नाव दिले आहे. या टूरद्वारे तुम्ही गोव्यातील प्रत्येक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकाल.

किती खर्च येईल?

IRCTC ने पॅकेजच्या किमती सिंगल ते ग्रुपमध्ये विभागल्या आहेत. एका व्यक्तीचे भाडे 47,210 रुपये असेल, तर दोन लोकांसाठी भाडे 36,690 रुपये असेल. तीन लोकांना जाण्यासाठी 36070 रुपये खर्च येईल.

5 ते 11 वर्षांच्या मुलांना 35150 रुपये आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलांना 34530 रुपये द्यावे लागतील.

या पॅकेजनुसार विमान गुवाहाटीहून गोव्याला जाणार आहे. याशिवाय, तुम्हाला इकॉनॉमी सीट देखील ऑफर केली जाईल. जर तुमचे बाळ 0-2 वर्षांचे असेल, तर त्याचे भाडे बुकिंगच्या वेळी IRCTC कार्यालयात रोख स्वरूपात जमा करावे लागेल.

IRCTC Goa Packages
Goa ITI: गोव्यातील आयटीआय प्रशिक्षणार्थींना टाटा ग्रुपचे 'इंडियन हॉटेल्स' शिकवणार आदरातिथ्य कौशल्य

टूरचा आनंद कसा घ्याल?

पहिल्या दिवशी गोव्यातील हॉटेलमध्ये मुक्काम, दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर उत्तर गोव्यातील ठिकाणांना भेटी होतील. या दिवशी उत्तर गोव्यातील बागा, हणजुणे, आग्वाद या पर्यटन स्थळांना भेट दिली जाईल.

तिसऱ्या दिवशी दक्षिण गोव्यातील साईट सीईंग यात ओल्ड गोवा चर्च, मिरामार बीच आणि दोना पावला येथे भेट दिली जाईल. त्यानंतर संध्याकाळी मांडवी नदीवर रिव्हर क्रूझचा आनंदही घेता येईल. चौथ्या दिवशी दूधसागर धबधबा येथे भेट दिली जाईल.

शेवटच्या 5 व्या दिवशी इतर काही साईट्सना भेटी आणि परत हॉटेल असे हे पॅकेज असेल. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर जाऊन माहिती घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com