Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

'डिनर डिप्लोमसी'च्या माध्यमातून सीएम योगींची नेत्यांशी चर्चा

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील (Uttar Pradesh Assembly Election 2022) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) भाजपच्या (BJP) बड्या नेत्यांची देखील भेट घेणार आहेत. त्याचवेळी, दिल्लीला जाण्यापूर्वी सीएम योगी यांनी लखनऊमध्ये भाजपच्या राज्य नेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत जेवणाचा अस्वाद ही घेतला. डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून सीएम योगींनी नेत्यांशी चर्चा करत त्यांच्या प्रतिक्रिया जाणुन घेतल्या. यावेळी राज्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशीही चर्चा समोर आली आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपदासाठी काही बड्या नेत्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मात्र, होळीनंतरच यावरती पडदा पडणार आहे. मात्र ज्या नावांवरती भाजप हायकमांड मोहर उमटवणार आहे, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. (CM Yogi discusses with leaders through dinner diplomacy)

राज्यात भाजपचा मोठा विजय झाल्याने नवीन सरकार स्थापनेची तयारी जोरदार सुरू झाली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री योगी तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या इतर नेत्यांची भेट घेतील आणि राज्यातील विजयाबद्दल यूबीजेपी यांचे अभिनंदन करतील. सीएम योगी यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कारण या दौऱ्यात नवीन सरकारची स्थापना, मंत्रिमंडळात सामील होणारे चेहरे आणि शपथविधीच्या तारखांसह इतर विषयांवरती होणारी चर्चा यांना उधान येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमदारांची यादी राज्यपालांकडे केली सुपूर्द

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन राजीनामा आणि आमदारांची यादी सादर केली आहे. यासोबतच विधानसभेच्या सर्व समित्याही बरखास्त करण्यात आल्या. सध्या सर्वांच्या नजरा होळीनंतर होणाऱ्या शपथविधीकडे रोखल्या गेल्या आहेत. सीएम योगी यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, प्रदेश सरचिटणीस संघटन सुनील बन्सल यांच्याशीही विविध विषयांवरती चर्चा केली असून या बैठकीत त्या नावांवर चर्चा झाल्याचे समजते, ज्याचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या डिनरला विजयाचे शिल्पकारांची उपस्थिती,

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीत नव्या सरकारच्या स्वरूपावरती चर्चा झाली. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात भाजपचा पूर्ण भर जातीय समीकरणांवर असेल, अशी शक्यता दर्शवली जात आहे. मात्र मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या नावांवरती अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीतच होईल. शनिवारी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपीचे संघटना प्रभारी राधामोहन सिंह, निवर्तमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीवरतीही चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे.

अनेक नेते मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दैऱ्यावरती,

यावेळी पक्षाकडून उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बदलून प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना सरकारमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते, अशी चर्चा रंगत आहे. याआधीही ते योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत, त्याचवेळी मुख्यमंत्री योगी यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात यूपीचे संघटना प्रभारी राधामोहन सिंह, निवर्तमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल हेही दिल्लीला जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT