Sonia Gandhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi
Sonia Gandhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi Dainik Gomantak

Assembly Elections: CWC बैठकीत सोनिया, राहुल अन् प्रियांका गांधी देणार राजीनामा?

यूपीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Elections) रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
Published on

यूपीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आपल्या पदांचा राजीनामा देऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे. (Sonia Gandhi, Rahul Gandhi and Priyanka Gandhi may resign at the CWC meeting tomorrow)

Sonia Gandhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांची उद्या शिखर बैठक

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीतील बहुतांश सदस्य गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्याचे मानले जातात. अशा परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजीनाम्याची ऑफर दिली तर सीडब्ल्यूसीमध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहावे लागणार आहे. प्रियांका गांधी यांनी संपूर्ण निवडणूक प्रचाराची कमान आपल्या हातात ठेवली होती. म्हणूनच पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारुन त्या राजीनामा देऊ शकतात. CWC ही काँग्रेसची धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे.

तसेच, काँग्रेसच्या पराभवानंतर केरळचे खासदार शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधीच वरिष्ठ पातळीवर बदलांची मागणी केली आहे. मात्र, कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि डीके शिवकुमार यांनी गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त केला आहे. पराभवानंतर यूपी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, यूपी काँग्रेसचे इलेक्ट्रॉनिक मीडिया समन्वयक झीशान हैदर यांची नेतृत्वाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com