Shivraj Singh Chouhan Dainik Gomantak
देश

सीएम शिवराज सिंह चौहान बेरोजगार राहणार नाहीत, ते चांगले अभिनेते आहेत: कमलनाथ

2018 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 230 सदस्यीय विधानसभेत 114 जागा जिंकून आघाडी सरकार स्थापन केले होते.

Ashutosh Masgaunde

CM Shivraj Singh Chauhan will not remain unemployed, he is a good actor: Kamal Nath

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी दावा केला की, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर लोक मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना निरोप देतील, परंतु चौहान बेरोजगार होणार नाहीत, कारण ते एक "चांगले अभिनेते" आहेत.

राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या सागर जिल्ह्यातील राहली विधानसभा मतदारसंघात कमलनाथ एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

‘पोलीस, पैसा आणि प्रशासन’ यांच्या जोरावर सुरू असलेल्या राज्यातील भाजप सरकारकडे केवळ चार दिवस उरले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आगामी निवडणुकांनंतर मध्य प्रदेशातील जनता चौहान यांना निरोप देईल, असा दावा कमलनाथ यांनी केला.

शिवराज सिंह मुख्यमंत्री राहू शकत नाहीत, पण ते बेरोजगार राहणार नाहीत. ते एक चांगले अभेनेते आहेत. आणि अभिनय कारकीर्द करण्यासाठी आणि मध्य प्रदेशचे नाव मोठे करण्यासाठी ते मुंबईला जाणार आहेत, असे कमलना्थ म्हणाले. .

2018 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 230 सदस्यीय विधानसभेत 114 जागा जिंकून आघाडी सरकार स्थापन केले होते.

या निवडणुकीत भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या गटाच्या बंडखोरीमुळे कमलनाथ त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मार्च 2020 मध्ये पडले.

सिंधिया गटाच्या आमदारांच्या पाठिंब्याने भाजप पुन्हा सत्तेवर आला आणि शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले.

आतापर्यंत मध्य प्रदेशात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच होती. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षासोबतच प्रादेशिक पक्ष गोंडवाना सरकार पक्षाचाही राज्यातील विविध भागात प्रभाव आहे. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीदेखील आपला ठसा उमटवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT