Eid-Ul-Fitr 2022 News in Goa Dainik Gomantak
देश

Eid-Ul-Fitr 2022: मुख्यमंत्री सावंतासह दिग्गज नेत्यांनी ट्विट करत देशवासियांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

दिल्लीसह देशभरात सोमवारी ईदचा चंद्र दिसल्यानंतर, आज म्हणजेच मंगळवारी, मुस्लिम समाजातील लोक पवित्र रमजान महिन्यात 30 दिवस उपवास केल्यानंतर ईदचा सण साजरा करतील. ईदचा चंद्र पाहिल्यानंतर सर्वजण मुस्लिम समाजातील लोकांना शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पीएम मोदी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आनंदाच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. (Eid-Ul-Fitr 2022 News in Goa)

प्रमोद सावंत यांनी ट्विट करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पीएम मोदींनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. हा शुभ सोहळा आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो.

त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभावाच्या आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो

परराष्ट्र मंत्री यांनी सुद्धा ट्विट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT