CM K Chandrasekhar Rao Dainik Gomantak
देश

'तुम्‍हारी जीभ काट लूंगा अगर'...म्हणत सीएम के. चंद्रशेखर रावांनी भाजप प्रमुखाला भरला दम!

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारने (Modi Government) आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मागील दीड ते दोन वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र कृषी कायद्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे मात्र भाजपचे नेते मंडळी नागरीकांना मोदी सरकार शेतकऱ्यांचा विचार कसा करत आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. याच पाश्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव (CM K Chandrasekhar Rao) यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यासोबतच त्यांनी 'लूज टॉक' टाळावे अन्यथा 'आम्ही त्यांची जीभ छाटू', असा इशारा देखील त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय (BJP state president Bandi Sanjay) यांना दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना केसीआर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ''संजय तेलंगणातील (Telangana) शेतकऱ्यांना भातशेती करण्यास सांगत असून त्यावर त्यांच्या पिकाची खरेदी भाजप करेल, अशी खोटी आशाही दाखवत आहेत.'' त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी धान खरेदी करणार नसल्याचे केंद्राने सांगितले असल्याचा उल्लेख देखील यावेळी बोलताना त्यांनी केला. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना इतर पिकांची निवड करण्यास सांगितले होते. तसेच मोदी सरकार बेजबाबदारपणे वागत असल्याचे देखील यावेळी चंद्रशेखर यांनी म्हटले.'

केसीआर म्हणाले, 'मी थेट संबंधित केंद्रीय मंत्र्याकडे गेलो आणि केंद्राने खरेदी केलेला तांदूळ घेण्यास सांगितले. याबाबत निर्णय घेऊन मला कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, मात्र आजपर्यंत मला कोणतीही माहिती मिळालेली नाही. तेलंगणा राज्यात गतवर्षातील सुमारे पाच लाख टन धान शिल्लक आहे, परंतु केंद्र सरकार ते खरेदी करत नाही. यानंतर त्यांनी केंद्र खरेदी करत नसलेली पिके शेतकऱ्यांना घेण्यास सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'केंद्र म्हणतेय धान खरेदी करणार नाही आणि भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतायेत आम्ही खरेदी करु, अशा खोट्या गोष्टी बोलू नका. तुम्ही आमच्याबद्दल अनावश्यक कमेंट केल्यास आम्ही तुमची जीभ छाटून काढू.' सीएम एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले, 'संजय म्हणतो, मला जेलमध्ये पाठवतो. मी त्याला आव्हान देतो की, मला हात तर लावून दाखव. भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांवर निशाणा साधताना केसीआर म्हणाले, 'अरुणाचलमध्ये चीन आमच्यावर हल्ले करत आहे. मात्र केंद्र चीनविरोधात कोणतीही कारवाई करत नाही. आम्ही आतापर्यंत गप्प बसलो होतो, पण आता गप्प बसणार नाही. आम्ही कायदेशीर कारवाई सुरु करु.' उत्तर प्रदेशात तुम्ही (BJP) गाडी चालवून शेतकऱ्यांना मारत आहात. तसेच मागील काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी लोकांना शेतकऱ्यांना मारहाण करण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे देखील यावेळी बोलताना केसीआर यांनी उल्लेख केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Drugs News: गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटसंबंधी केरळच्या युवकास अटक; आणखी परप्रांतीय सापडण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT