Crime News
Crime News Dainik Gomantak
देश

लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विष पाजलं, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

दैनिक गोमन्तक

लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने वर्गमित्रांनी 19 वर्षीय मुलीला विष पाजले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना राजस्थानमधील जयपुर येथे घडली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पीडित मुलीच्या वडिलांनी हलेना पोलिस ठाण्यात (Police Station) याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, भरतपूर येथील एका खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या मुलीचे पाच वर्गमित्र तिला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होते. मात्र, तीने याला विरोध केला. परिणामी त्यांनी मुलीला विष पाजले. याबाबत बोलताना हलेनाचे एसएचओ विजय सिंह म्हणाले, बुधवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 328 (विधाने दुखापत करणे) आणि 341 अंतर्गत युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू करण्यात आला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीडितेच्या वडिलांनी आरोपानुसार, मंगळवारी त्यांच्या मुलीने आईला फोन करून मुलांची तक्रार केली. तीने आईला सांगितले की, महाविद्यालयातील काही विद्यार्थी (Students) शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास ती घरी परतत असताना या युवकांनी तिचा पाठलाग केला आणि तिला जबरदस्तीने काहीतरी प्यायला लावले. थोड्याच वेळात तिला उलट्या होऊ लागल्या. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Today's Live News: सुकूर येथे ट्रक आणि कारचा अपघात

राजस्थानमधून गुजरातमध्ये करायचा विदेशी मद्य तस्करी; 50 हजारांचे बक्षीस असणारा डांगी अखेर गोव्यात जेरबंद

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT